शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

...आता रिन बारमध्ये ‘स्मार्ट फोम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:01 IST

राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘रिन बार’ने पुढाकार घेतला असून, २०२० पर्यंत हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘यूएसएलपी’ने उत्पादनांच्या बाबतीत पाण्याचा

मुंबई : राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘रिन बार’ने पुढाकार घेतला असून, २०२० पर्यंत हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘यूएसएलपी’ने उत्पादनांच्या बाबतीत पाण्याचा वापर कमी करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. नव्याने दाखल झालेल्या ‘रिन बार’मध्ये साबणातील ‘स्मार्ट फोम’ तंत्रज्ञानामुळे अर्ध्या पाण्यातच कपडे धुता येणे शक्य होणार आहे. हा नव्या तंत्रज्ञानाने उपयुक्त असणारा साबण बाजारात उपलब्ध आहे.पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी ‘रिन बार’तर्फे जनजागृतीपर अभियान राबविण्यात येणार आहे. यापूर्वीही ‘रिन बार’च्या वतीने पाणीबचतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. भविष्यातील पाणीसंकटावर उपाय म्हणून अद्ययावत तंत्रज्ञान वापरून, या अभिनव ‘रिन बार’ साबणाची निर्मिती करण्यात आली आहे. या साबणाच्या वापराने दिवसभरात होणारा पाण्याचा वापर अर्ध्यावर येतो, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.जनजागृतीपर अभियानांतर्गत सामान्यांच्या पाणीवापराविषयी सवयी बदलण्यासाठी पुढाकार घेणे आणि दुसºया बाजूला ज्यातून पाणी वाचविता येईल, तो ‘रिन बार’ सामान्यांपर्यंत पोहोचविणे हे दोन टप्पे आहेत, असे या रिन बार साबणाच्या उत्पादनाचे मुख्य अधिकारी विपुल माथुर यांनी सांगितले. याशिवाय रेन हार्वेस्टिंग, पाणीसाठा यांचा विचार करून बंधारे आणि शिवारांचे काम करण्यावरही भर दिला जात आहे. त्यासंबधी राज्यातील खामगाव आणि अन्य काही ठिकाणी प्रकल्प सुरू असल्याचे माथुर यांनी सांगितले.अभिनव उत्पादनाबद्दल बोलताना, दक्षिण आशियातील रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या प्रमुख मीना राजन म्हणाल्या की, हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शाश्वत जीवनावश्यक धोरणानुसार केवळ उत्कृष्ट नाही, तर दर्जात्मक आणि टिकाऊ उत्पादनांवर भर आहे.‘रिन बार’ हे एक उदाहरण आहे, जे कपडे स्वच्छ आणि चमक देण्याव्यतिरिक्त आता ‘स्मार्ट फोम तंत्रज्ञान’ पुरविणार आहे. शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि अभियंते यांच्या चमूने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामुळे ग्राहक कमी पाणी वापराची सवय अंगीकारतील. यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाईच्या गंभीरतेमुळे होणाºया अडचणी कमी होण्यात मदत होईल.