शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला स्थैर्य देण्यासाठी गुंतवणूक वाढविण्याचे आश्वासन

By admin | Updated: December 28, 2015 04:03 IST

शेतकऱ्यांना तात्पुरती मदत करून समाधान करण्यापेक्षा शेतीला कायमस्वरूपी स्थैर्य देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर राज्य शासनाने भर दिला असून

अकोला : शेतकऱ्यांना तात्पुरती मदत करून समाधान करण्यापेक्षा शेतीला कायमस्वरूपी स्थैर्य देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर राज्य शासनाने भर दिला असून, मूल्यवर्धित शेती विकासासाठी गुंतवूणक वाढविणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘अ‍ॅग्रोटेक-२०१५’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, सलग चार ते पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर मोठी संकटे निर्माण झाली असून, उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील ६० वर्षांत आपण निश्चित धोरण आखू शकलो नाही. त्यामुळे त्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना वीज, पाणी, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहोत.प्रक्रिया उद्योगाची वाढ करण्यासाठी वस्त्रनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असून, त्याची शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातून सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विद्यापीठाने सीडलेस संत्रा संशोधन केले आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शीतपेय व इरिगेशन कंपनीसोबत करार केला आहे. दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीसाठी पूर्व विदर्भात प्रकल्प उभारणार आहोत. कृषिपंपांचा अनुशेष मार्च २०१६पर्यंत निकाली काढला जाईल. वीज बचतीसाठीचे आधुनिक कृषिपंप उपलब्ध केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडताना व्यवस्थेने कसे दुर्लक्ष केले, यावर विवेचन केले. (प्रतिनिधी)