शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

By admin | Updated: March 18, 2017 01:08 IST

सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल यांच्यावर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

बुलडाणा, दि. १७- आरोपींचा पुन्हा पीसीआर न घेता त्यांचा जामीन मंजूर करण्यासाठी ५ लाख ५0 हजार रुपये लाचेची मागणी करणार्‍या मेहकर पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल यांच्यावर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला. ३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दिल्या गेलेल्या तक्रारीनुसार, तक्रारकर्त्याच्या मित्रांवर मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सदर प्रकरणात आरोपींचा पुन्हा पीसीआर न घेता त्यांचा जामीन मंजूर करून त्यांच्यावर इतर गुन्हय़ात कारवाई न करावी, यासाठी तपास अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल यांनी ८ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी तक्रारकर्त्याने ४ लाख ५0 हजार रुपये बिलावल यांनी सांगितलेल्या बँक अकाउंटला ट्रान्स्फर केले, तर दीड लाख रुपये नगदी त्यांनी स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, बिलावल यांनी तक्रारकर्त्याकडे पुन्हा ५ लाख ५0 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारकर्त्याने एसीबीकडे धाव घेतली. तक्रारकर्त्याच्या तक्रारीच्या आधारे, एसीबीने तपासणी केली असता, त्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल यांने तक्रारदाराच्या मित्राला न्यायालयातून जामीन मिळवून देण्यात सहाय्य करण्यासाठी ५ लाख ५0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, एसीबीने रचलेल्या सापळय़ात बिलावल याने तक्रारकर्त्यांकडून लाचेची रक्कम खासगी वकिलाकडे देण्याचे सांगितल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी एसीबीद्वारे सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या ७, १५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.