शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाच मागितल्याप्रकरणी साहाय्यक वनसंरक्षक गजाआड !

By admin | Updated: April 28, 2016 22:11 IST

पातूर जंगल परिसरातील सागवानाची झाडे कापण्यासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार ३00 रूपयांची लाच मागणाºया अकोला वनसंरक्षक कार्यालयातील साहाय्यक

अकोला: पातूर जंगल परिसरातील सागवानाची झाडे कापण्यासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार ३00 रूपयांची लाच मागणाºया अकोला वनसंरक्षक कार्यालयातील साहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सर्जेराव नाईकवाडे(५२) याला गुरूवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी अटक केली. या घटनेमुळे वनसंरक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाईकवाडेला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
वाशिम जिल्ह्यातील एका कंत्राटदाराने पातूर तालुक्यातील जंगल परिसरातील सागवानाची झाडे तोडण्यासाठीचे कंत्राट मिळविले होते.  त्यासाठी त्याला अकोला वनसंरक्षक कार्यालयाच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी वनसंरक्षक कार्यालयाकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी रितसर अर्ज केला होता. नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे काम हे कार्यालयातील साहाय्यक वनसंरक्षक शिवाजी नाईकवाडे याच्याकडे असल्याने कंत्राटदाराने नाईकवाडे याच्यासोबत संपर्क साधला. नाईकवाडे याने कंत्राटदाराला आज, उद्या नाहरकत प्रमाणपत्र देतो. असे म्हणत, काही दिवस ताटकळत ठेवले. कंत्राटदाराने कंटाळून साहेब, तुमची काही डिमांड असेल तसे सांगा, असे नाईकवाडे याला म्हटले. त्यावर साहाय्यक वनसंरक्षक शिवाजी नाईकवाडे याने कंत्राटदाराला एका सागवान झाडाचे १00 रूपये, याप्रमाणे १२३ झाडांच्या कटाईचे १२ हजार ३00 रूपये देण्याची मागणी केली. यासंदर्भात कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी शिवाजी नाईकवाडे याची चौकशी केली असता, त्याने लाच मागितल्याचे समोर आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी गुरूवारी सायंकाळी वनसंरक्षक कार्यालयातून शिवाजी नाईकवाडे याला अटक केली.