शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
5
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
6
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
7
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
8
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
9
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
10
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
11
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
12
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
13
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
15
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
16
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
17
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
18
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
19
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
20
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 09:16 IST

Abhishek Sharma Create History: रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने विश्वविक्रमाला गवसणी घातली.

रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवत या स्पर्धेतील विजयी घोडदौड सुरू ठेवली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूपासूनच आक्रमकता दाखवत भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने आपला हेतू स्पष्ट केला. त्याने अवघ्या ३९ चेंडूत ७४ धावा करत भारताच्या विजयाचा पाया रचला. या वादळी खेळीदरम्यान अभिषेक शर्माच्या नावावर विश्वविक्रम नोंदवण्यात आला. तसेच त्याने भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगचाही विक्रम मोडीत काढला.

अभिषेक शर्मा हा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वात जलद ५० षटकार मारणारा फलंदाज ठरला. त्याने फक्त ३३१ चेंडूंमध्ये ही कामगिरी केली. त्याने वेस्ट इंडिजच्या एविन लुईसचा विश्वविक्रम मोडला, ज्याने ३६६ चेंडूंत ५० षटकार मारले. या यादीत आंद्रे रसेल तिसऱ्या, हजरतुल्लाह झझाई चौथ्या आणि सुर्यकुमार यादव पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३५० पेक्षा कमी चेंडूंमध्ये ५० षटकार मारणारा अभिषेक हा पहिला फलंदाज आहे.

युवराज सिंगला टाकले मागेअभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. २४ चेंडूंमध्ये अर्धशतक मारून अभिषेकने भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंगचा विक्रम मोडला. २०१२ मध्ये अहमदाबाद टी-२० मध्ये पाकिस्तानी संघाविरुद्ध युवराजने २९ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम मोहम्मद हाफिजच्या नावावर आहे. २०१२ मध्ये अहमदाबादमध्ये हाफिजने २३ चेंडूत अर्धशतक झळकावले.

टॅग्स :Asia Cup 2025आशिया कप २०२५Abhishek Sharmaअभिषेक शर्माIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान