शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

अश्विनी जोशी, केंद्रेकर, निधी पांडे यांची बदली

By admin | Updated: April 23, 2017 02:06 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या. त्यानुसार, सध्याचे जमाबंदी आयुक्त एस. पी. कडू-पाटील हे नवे साखर आयुक्त

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या. त्यानुसार, सध्याचे जमाबंदी आयुक्त एस. पी. कडू-पाटील हे नवे साखर आयुक्त असतील. बेस्टचे महाव्यवस्थापक जे. डी. पाटील नवे सहकार आयुक्त असतील. आतापर्यंत दुग्धविकास आयुक्त असलेले आर. जी. कुलकर्णी यांची बदली आदिवासी आयुक्तपदी करण्यात आली आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडे या राजीव गांधी जीवनदायी योजना सोसायटी; मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. क्रीडा आयुक्त राजाराम माने यांना मेडा; पुणेचे महासंचालक म्हणून पाठवले आहे.अन्य अधिकाऱ्यांची नवीन पदे आणि आधीची पदे (कंसात) अशी -एस. एम. केंद्रेकर; सहव्यवस्थापकीय संचालक एमएसईडीसीएल; औरंगाबाद (सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको), विजय झाडे - क्रीडा संचालक (जिल्हाधिकारी, बुलडाणा), विजय वाघमारे - पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (आयुक्त, कौशल्य विकास), सुरेश काकाणी - उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (जिल्हाधिकारी, नांदेड), अनिल कावडे - मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक; पुणे (जिल्हाधिकारी, अहमदनगर), पांडुरंग पोळे - मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए; पुणे (जिल्हाधिकारी लातूर), श्रावण हर्डीकर - महापालिका आयुक्त पिंपरी चिंचवड (महापालिका आयुक्त नागपूर), विपीन शर्मा - आयुक्त कौशल्य विकास (साखर आयुक्त), आर. व्ही. गमे - जिल्हाधिकारी उस्मानाबाद (व्यवस्थापकीय संचालक; महाबीज), अविनाश सुभेदार - जिल्हाधिकारी कोल्हापूर (नियंत्रक अन्न व नागरी पुरवठा), दिलीप शिंदे - नियंत्रक अन्न व नागरी पुरवठा (व्यवस्थापकीय संचालक महानंदा), किरण गित्ते - मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे महानगर विकास प्राधिकरण (जिल्हधिकारी अमरावती), अश्विनी जोशी - उत्पादन शुल्क आयुक्त (जिल्हाधिकारी मुंबई शहर). ओ.पी.बकोरिया - व्यवस्थापकीय संचालक महाबीज; अकोला (महापालिका आयुक्त, औरंगाबाद), डी. एम. मुगलीकर - औरंगाबाद महापालिका आयुक्त (सहआयुक्त विक्रीकर, औरंगाबाद), अश्विन मुदगल - महापालिका आयुक्त नागपूर (जिल्हाधिकारी सातारा), अभय महाजन - जिल्हाधिकारी बीड (मनरेगा आयुक्त नागपूर), अभिजित बांगर - जिल्हाधिकारी अमरावती (जिल्हाधिकारी पालघर), नवलकिशोर राम - जिल्हाधिकारी औरंगाबाद (जिल्हाधिकारी बीड), चंद्रकांत पुलकुंडवार - जिल्हाधिकारी बुलडाणा (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया), श्वेता सिंघल - जिल्हाधिकारी सातारा (उपसचिव कामगार), शीतल उगले - मुख्य प्रशासक सिडको औरंगाबाद (जिल्हाधिकारी रायगड), प्रशांत नारनवरे - जिल्हाधिकारी पालघर (जिल्हाधिकारी उस्मानाबाद), जी.श्रीकांत - जिल्हाधिकारी नांदेड (जिल्हाधिकारी अकोला), एस.एल.अहिरे - संचालक व्हीजेएनटी पुणे (मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा जि.प.), अरुण विधळे - उपसचिव कामगार (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अकोला), दीपा मुधोळ -सहआयुक्त विक्रीकर; औरंगाबाद (मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा जि. प.), एम.देवेंदरसिंग -जिल्हाधिकारी लातूर (मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर जि. प.), आस्तिक पांडे -जिल्हाधिकारी अकोला (मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जि.प.), षन्मुगराजन - मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा जि.प. (सहाय्यक जिल्हाधिकारी धारणी. विजय राठोड - सहाय्यक जिल्हाधिकारी धारणी (सहाय्यक जिल्हाधिकारी दर्यापूर), अमोल येडगे - सहाय्यक जिल्हाधिकारी नाशिक (सहाय्यक जिल्हाधिकारी कळमुनरी) व्ही. व्ही. माने - मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला जि.प. (जातपडताळणी समिती पुणे), मनोज सूर्यवंशी -मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा जि.प. (जातपडताळणी समिती नागपूर), आर.एच.ठाकरे - मुख्य कार्यकारी अधिकारी, गोंदिया जि.प. (अध्यक्ष जातपडताळणी समिती अमरावती), जे.एस.पापळकर - मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर जि.प. (उपायुक्त, महसूल नागपूर), एस. डी. मांढरे -मुख्य सचिवांचे सहसचिव (आधीही याच पदावर). एस. जी. कोलते - मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जि. प. (उपायुक्त महसूल नाशिक), आर. डी. निवतकर - संचालक आपत्ती व्यवस्थापन कक्ष (सहसचिव मदत व पुनर्वसन), अविनाश ढाकणे - मनपा आयुक्त सोलापूर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मुंबई), ए. ए. गुल्हाने -सहमुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मुंबई (ऊर्जामंत्र्यांचे खासगी सचिव), कैलाश जाधव - उपसंचालक भूमिअभिलेख; पुणे (अध्यक्ष, जातपडताळणी समिती लातूर), जी.एम.बोडके - आयुक्त मत्स्यव्यवसाय (अतिरिक्त आयुक्त औरंगाबाद), चंद्रकांत डांगे - अतिरिक्त आदिवासी आयुक्त ठाणे (सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा).(विशेष प्रतिनिधी)पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे हे नाशिकचे विभागीय आयुक्त असतील. नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना जलसंधारण विभागाचे सचिव करण्यात आले आहे. तसेच पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक के.एच.गोविंदराज सिकॉमचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील.