शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर !

By admin | Updated: November 7, 2016 23:10 IST

पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून या शाळेमधील ३८८ विद्यार्थ्यांचे अद्याप दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्यात आलेले नाही.

गणेश मापारी/ऑनलाइन लोकमत खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 7 - पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून या शाळेमधील ३८८ विद्यार्थ्यांचे अद्याप दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्यात आलेले नाही. दिवाळीच्या सुट्यानंतर बुधवारी शाळा सुरु होणार असल्याने यासर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.खामगाव तालुक्यातील पाळा येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेमध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात १७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात दोषी असलेल्या आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ८ जणांविरुध्द निलंबनाची कारवाई करण्यात आली असून सोमवारी देखील आणखी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोषींना निलंबित करण्यासोबत या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध आदिवासी शाळांमध्ये त्वरित समायोजन करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली. तथापी दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचाच अवधी शिल्लक असताना अद्याप विद्यार्थ्यांचे समायोजन कोणत्याही शाळेत करण्यात आलेले नाही. पाळा येथील आश्रम शाळेची मान्यता रद्द असल्याने ही शाळा उघडणारच नसून पुढील शिक्षणासाठी दुसरी शाळाही अद्याप निश्चीत झालेली नाही. त्यामुळे या शाळेतील सर्व ३८८ विद्यार्थ्यांसाठी बुधवारी शाळाच उघडणार नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मुळगावी वेगवेगळी पथके पाठविली असून विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार त्यांचे आदिवासी शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला बराच अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत त्वरित निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.आश्रमशाळेत पाच जिल्ह्यातील विद्यार्थीपाळा येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेत पाच जिल्ह्यांमधील विद्यार्थी शिकतात. बुलडाणा, वाशिम, अकोला, जळगाव आणि अमरावती या पाच जिल्ह्यांमधील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना या आश्रम शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांशी भेटणे आणि विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करणे यासाठी आदिवासी विभागाच्या पथकाकडून प्रयत्न सुरु आहेत. निवासी शाळेच्या नावाने पालकांमध्ये भीतीविद्यार्थिनींवर घडलेला अत्याचार हा निवासी आश्रम शाळेमध्ये झालेला आहे. त्यामुळे निवासी शाळेबाबत आता या शाळेमधील सर्व विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी पाळा येथील आश्रम शाळेत आहेत. त्यामुळे आता पाळा येथीलच नव्हे तर कोणत्याही निवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनींनाच नव्हे विद्यार्थ्यांनाही पाठविणार नसल्याची भूमिका काही पालकांनी घेतल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.दिवाळीची सुट्टी असल्याने सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित भेटणे शक्य नाही. त्यामुळे पाच जिल्ह्यांमध्ये आदिवासी विभागाचे पथक पाठविण्यात आले आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे समायोजन दुसऱ्या आदिवासी शाळांमध्ये करण्यात येईल.-व्ही.ए. सोनवणे, प्रकल्प अधिकारी आदिवासी प्रकल्प कार्या.अकोला