शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाणांची चौकशी सूडबुद्धीतून नाही

By admin | Updated: April 21, 2017 03:44 IST

आदर्श घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सीबीआय चौकशी राजकीय सूडबुद्धीतून किंवा बेकायदा आहे असे म्हणता येणार नाही...

मुंबई : आदर्श घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सीबीआय चौकशी राजकीय सूडबुद्धीतून किंवा बेकायदा आहे असे म्हणता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे घेतली आहे.गेल्या वर्षी फेब्रुवारीत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ‘आदर्श’ प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यास सीबीआयला मंजुरी दिली. याविरुद्ध चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर उत्तरादाखल राज्य सरकारने उच्च न्यायालयात आज प्रतिज्ञापत्र सादर केले.राजकीय हेतूने व सारासार विचार न करता कारवाईला परवानगी दिली असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला असून राज्य सरकारने तो फेटाळला आहे. राज्यपालांनी आवश्यक त्या व्यक्तींकडून सल्ला घेऊन व सीबीआयने सादर केलेली कागदपत्रे लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला, असे सरकारने म्हटले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सोमनाथ बागुल यांनी हे प्रतिज्ञापत्र न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे सादर केले. खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी जून महिन्यात ठेवली आहे.आदर्श सोसायटीला अतिरिक्त एफएसआय देऊन त्याबदल्यात दोन नातेवाइकांसाठी ‘आदर्श’मध्ये सदस्यत्व मिळवले, असा आरोप सीबीआयने चव्हाणांवर ठेवला आहे. तसेच ‘आदर्श’मधील ४० टक्के फ्लॅट नागरिकांसाठी उपलब्ध केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. आदर्श घोटाळा प्रकरणी सीबीआयने डिसेंबर २०१३मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यात चव्हाण यांचे आरोपी म्हणून नाव आहे. मात्र, तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायण यांनी चव्हाणांवर कारवाईची परवानगी न दिल्याने सीबीआय कारवाई करू शकले नाही. त्यानंतर चव्हाण यांनी या घोटाळ्यातून आपले नाव वगळावे, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)