शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

अशोक चव्हाण फूट पाडताहेत- नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:39 IST

सावंतवाडी : प्रदेशस्तरावरून बैठकीसाठी नेतेमंडळी सिंधुदुर्गमध्ये येत आहेत याची माहिती येथील नेतृत्वाला नसावी, यासारखे दुर्दैव काही नाही. नारायण राणे हेच आमच्यासाठी देवासमान आहेत.

ठळक मुद्दे सावंतवाडीतील काँग्रेसची बैठक ‘हायजॅक’ राणे यांनी केलेल्या आरोपावर प्रदेश काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिलेबैठकीचे निमंत्रण काँग्रेस नेते नारायण राणेंसह आमदार नीतेश राणे व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाºयांना नव्हते.

लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : प्रदेशस्तरावरून बैठकीसाठी नेतेमंडळी सिंधुदुर्गमध्ये येत आहेत याची माहिती येथील नेतृत्वाला नसावी, यासारखे दुर्दैव काही नाही. नारायण राणे हेच आमच्यासाठी देवासमान आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये असतानाही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आमच्यात फूट पाडण्याचे काम करीत आहेत, असा आरोप करून हे आम्ही खपवून घेणार नाही, असा सज्जड दम आमदार नीतेश राणे यांनी प्रदेशस्तरावरून आलेल्या काँग्रेस नेत्यांना भरला. तसेच प्रदेश काँग्रेसतर्फे सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेली बैठक जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनीच ‘हायजॅक’ केल्याचे चित्र निर्माण झाले होते.

आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या आरोपावर प्रदेश काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. आम्हाला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फूट पाडण्यासाठी पाठविले नसून येथील काँग्रेस एकसंध बघून आम्हाला आनंद झाला आहे. त्यामुळे या बैठकीचा वेगळा अर्थ कोणी काढू नये, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन बैठका आयोजित केल्या होत्या. त्यात एक बैठक जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी ओसरगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावाघेण्यासाठी लावली होती. तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्गमध्ये एक नेत्यांचे शिष्टमंडळ पाठविले होते. त्यांनीही सावंतवाडीतील आरपीडी हायस्कूलमध्ये दुपारी ३.३० वाजता बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीचे निमंत्रण काँग्रेस नेते नारायण राणेंसह आमदार नीतेश राणे व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाºयांना नव्हते.

ओसरगाव येथील सकाळी ११ वाजताची नियोजीत बैठक आटोपून आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात प्रदेश स्तरावरील नेत्यांनी आयोजित बैठकीसाठी आमदार नीतेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते दाखल झाले. जुने-नवे काँग्रेसचे पदाधिकारी एकाच ठिकाणी दाखल झाल्याने पोलिसांनीही बैठक स्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस सभास्थळी होते.

बैठक सुरू होताच आमदार नीतेश राणे त्यांनी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना विश्वासात न घेता कोणी बैठक आयोजित केली? असा प्रश्न केला. याचा प्रथम खुलासा करा, अशी मागणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विकास सावंत यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.

प्रांतिक सदस्य म्हणून आपण या बैठकीस उपस्थित राहिलो आहे. बैठकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांकडून जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो झाला नाही. त्यामुळे गैरसमज झाले, असे सावंत यांनी सांगितले. त्यांना आमदार नीतेश राणे यांनी रोखत आम्ही तुमचे भाषण ऐकण्यासाठी आलो नाही, तुम्ही आमचे ऐका, असे सांगितले. यावेळी राजन भोसले यांनी माईक हातात घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी राणे यांनी त्यांना रोखत खडे बोल सुनावले. आम्ही अजूनही गांधी घराण्याच्या विचाराने काँग्रेसमध्ये काम करतो. काँग्रेसला राज्यात कुठे मिळाले नाही असे यश नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळाले आहे हे ध्यानात ठेवा असे ठणकावले.यावेळी राणे समर्थकांनी ‘राणे साहेबांचा विजय असो, नीतेश राणेसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या. जिल्ह्यात अतिशय कठिण परिस्थितीत नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकल्या; मात्र प्रदेश कमिटीकडून एकदाही आमचे अभिनंदन करण्यात आले नाही, अशी खंत दत्ता सामंत यांनी व्यक्त करत आपण स्वत: जिल्हाध्यक्ष असून सुद्धा सभासद आपणाला नोंदणीचे पुस्तक अद्याप मिळाले नसल्याचे दलवाई यांना सांगितले.जिल्हा काँग्रेस एकसंघ पाहून आनंद : दलवाईवातावरण शांत झाल्यानंतर दलवाई यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, नारायण राणे आपले नेते आहेत. ते जिल्ह्यात आहे हे आपणाला माहीत असते तर त्यांची भेट घेऊनच दौºयाची सुरुवात केली असती. काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे काम कोणी करत नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. जिल्हा काँग्रेस एकसंघ आणि सक्षम आहे हे पाहून आपणाला आनंद झाला. काँग्रेस हा भाजपासारखा नसून येथे समर्थनाबरोबरच निषेध नोंदविण्यासाठी वाव आहे, असे खासदार दलवाई म्हणाले.भाजप प्रवेशासाठी ईडीच्या धमक्या : दलवाईदेशात सर्वच पक्षाच्या नेत्यांना भाजप प्रवेश करा अन्यथा तुमच्यामागे ईडीची चौकशी लावू, असे सांगून त्यांना हैराण केले जात आहे. या धमक्यांना काँग्रेस भीक घालत नाही. हे या जिल्ह्याबाबत बोलत नसून, संपूर्ण ठिकाणीच अशी वाईट परिस्थती निर्माण झाली आहे. देशात भाजपने गढूळ वातावरण निर्माण केले आहे. पण याचा तोटा त्यांना सहन करावा लागेल, अशी जोरदार टीका खासदार हुसेन दलवाई यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. त्यांनी बैठकीनंतर संवाद साधला. तसेच ही बैठक प्रदेशस्तरावरून आयोजित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.सभास्थळी काँग्रेसबरोबरच शिवसेनेचेही पदाधिकारीबैठकीच्या स्थळी काही तरी गोंधळ होईल या भीतीने पोलिसांनी पूर्णत: नाकाबंदी केली होती. मात्र, बैठक स्थळी जुने-नवे काँग्रेसचे पदाधिकारी होतेच, त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारीही हजर होते. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी ही बाब काँग्रेसच्या नेत्यांना सांगितली. आमच्या अंतर्गत वादात शिवसेना का नाक खुपसते, असा सवालही त्यांनी केला.काँग्रेस नेते विकास सावंत यांचा मुलगा बाहेर उभा आहे, असे यावेळी आमदार राणे यांनी स्पष्ट केले.पक्ष नंतर बाबा पहिले : विक्रांत सावंतमी बैठकीसाठी आलो नव्हतो. मात्र बैठकस्थळी काही तरी होईल, माझे बाबा प्रदेश काँग्रेसचे सदस्य आहेत, त्यांना काही तरी त्रास होईल, यासाठी मी बैठकस्थळी आलो होतो. शिवसैनिक म्हणून नाही, असा खुलासा विक्रांत सावंत यांनी केला....अन्यथा नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाहीपक्षाचे आदेश नारायण राणेंच्या माध्यमातून आले तरच त्या आदेशांची अंमलबजावणी केली जाईल. राणेंना भेटल्याशिवाय कोणत्याही नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा नीतेश राणे यांनी दिला. तसेच इथे भाषण करण्यापेक्षा तुमच्या भागात भाषण केला असता, तर नगरसेवक झाला असता. मी वयाने लहान असून आमदार आहे, असा टोलाही त्यांनी भोसले यांना लगावला.