शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भरसभेत अशोक चव्हाणांवर शाईहल्ला

By admin | Updated: February 11, 2017 20:58 IST

नागपुरातील हसनबाग येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह मंचावर उपस्थित नेत्यांवर एका असंतुष्ट कार्यकर्त्याने शाई फेकली.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 11-  पूर्व नागपुरातील हसनबाग येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह मंचावर उपस्थित नेत्यांवर एका असंतुष्ट कार्यकर्त्याने शाई फेकली. काही असंतुष्टांनी लांबून अंडेही फेकले. यामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी शाही फेकणा-याला बोदम चोप दिला. या प्रकारामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. 
 
ललित बघे असे शाईहल्ला करणा-याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या सभेत माजी मंत्री नसीम खान यांचे भाषण सुरू असताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मंचावर आले. मंचावर माजी मंत्री विलास मुत्तेमवार, आ. भाई जगताप, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, शेख हुसैन, अशोक धवड आदी नेते उपस्थित होते.
 
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माथाडी कामगारांचे नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक असलेले ललित बघेल हे एकाएक मंचावर आले. त्यांनी खिशातून एक बॉटल काढत अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकली. याच वेळी लांबून काही कार्यकर्त्यांनी मंचाच्या दिशेने अंडे फेकले. एवढ्याच मंचावर उपस्थित पदाधिका-यांनी शाई फेकणा-याला पडकले व चोप देण्यास सुरुवात केली. 
 
यानंतर समर्थकांनीही बेदम चोप दिला. या प्रकारामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. चव्हाण सभा सोडून निघून गेले. काही वेळांनी तणाव निवळल्यावर चव्हाण पुन्हा मंचावर आले व भाषणही दिले.
 
सभेमध्ये विघ्न आणण्याचे प्रयत्न - अशोक चव्हाण
 
 छुप्या पद्धतीने भाजप-सेनेचा प्रचार करणा-यांचा हा डाव आहे. शाई फेकणा-याला कार्यकर्त्यांनी पकडले आहे. त्याने का व कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला याची माहिती घेतली जात आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष  अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.  काँग्रेसची सभा उधळण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. भाजपाला मदत करण्याची भूमिका या घटनेमागे दिसून येते. मात्र, घटनेनंतरही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे सभा घेण्यात आली. माजी मुख्यमंत्र्यांची सभा असतानाही सभेला नावापुरतीच सुरक्षा व्यवस्था होती याकडे लक्ष वेधत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.