शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी यात्राः एकादशी सरली गर्दी ओसरली

By admin | Updated: July 16, 2016 21:12 IST

आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे चरणस्पर्श झाल्यानंतर अवघा शीण गेला आणि लाखो वारकरी आनंदाने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले

दीपक होमकर / ऑनलाइन लोकमत -
आता कोठे धावे मन
तुझे चरण देखिलिया !
भाग गेला, सीण गेला,
अवघा झाला आनंद !!
पंढरपूर, दि. 16 - आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे चरणस्पर्श झाल्यानंतर अवघा शीण गेला आणि लाखो वारकरी आनंदाने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. पण पांडुरंगाची पंढरी सोडून जाण्याची हुरहुरीने भाविकांचे मन दाटून आले.
 
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीत पंधरा लाखापेक्षा अधिक भाविक दाखल झाले होते मात्र दुसर्‍याच दिवशी त्यातील पन्नास टक्क्याहून अधिक भाविक दर्शन घेऊन गावाकडे परतले. त्यामुळे पंढरपूरात आज निम्मी गर्दी कमी झाली. शहरातील गर्दीकमी झाली असली तरी दर्शनाच्या रांगेत मात्र लाखावर भाविक उभे होते.  आज पहाटे  चार ते पाच यावेळेत मंदिराच्या वतीने नित्यपूजा करण्यात आली आणि केवळ एक तास दर्शनबारी थांबविण्यात आली. त्यामुळे एकादशीप्रमाणे भाविकांना चार-चार तास रांगेत ताटकळत रहावे लागले नाही आणि कालच्या तुलनेत आज व्दादशीला चार-पाच हजार जास्त भाविकांनी दर्शन घेतले.
 
काल रात्रभर राहुट्यांमध्ये भजन-किर्तन केल्यावर पहाटे चंद्रभागेचे स्नान करून काहींनी विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले तर काहींनी कळसाचे दर्शन घेऊन सकाळपासूनच पंढरीचा निरोप घेण्यास सुरवात केली. त्यामुळे सकाळपासून एसटी स्थानक, रेल्वे स्टेशन येथे मोठी गर्दी वाढली होती.
 
एकादशी पेक्षा व्दादशीला अधिक जणांनी घेतले पददर्शन
एकादशी सुरु होण्याच्या आदल्या रात्री रात्री एक ते पहाटे पाच पर्यंत नित्यपूजा, शासकीय पूजा यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते मात्र व्दादशीला केवळ पहाटे चार ते पाच या एका तासासाठीच मंदिर बंद ठेवण्यात आले. तुलनेेने तीन तास अधिकवेळ दर्शन सुरु असल्याने व्दादशीला सुमारे साडेआठ हजार भाविकांना अधिक दर्शन घेतले.
रात्रभर गरजली पंढरी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने काल पंढरपूरात आलेल्या बहुतांश भाविकांनी रात्री मुक्काम केला आणि मठांमध्ये, राहुट्यांमध्ये भजन-कीर्तन भारूडाचा आनंद घेतला. त्यामुळे पंढरपूर शहरात रात्रीही दूरदूर पर्यंत टाळांचा किनकिनाट, पखवाजाची थाप आणि हरीनामाचा गजराचा ध्वनी ऐकू येत होता. तर अनेक हौशी तरुण वारकर्‍यांनी रात्री महाव्दारासमोरील गर्दी कमी झाल्यावर वाजत गाजत भजन म्हणत नामदेव पायरीसमोर येऊन विविध खेळ खेळले आणि वारकरी सांप्रदायाच्या संस्कृतीचा आनंद लुटला.
 
आनंदाने मन अन खरेदीने बॅग भरली
वारीत आलेल्या वारकर्‍यांनी परत जाताना विठ्ठलाचा चिरमुरे बत्ताशाचा प्रसाद, विठ्ठलाचे फोटो, टाळ-मृदुंग-पेटी सारखी संगीत वाद्य, देवघरातील पितळी मुर्त्या, दगडी मुर्त्या, कुंकू, उदबत्त्या आणि घरातील लहानग्यांसाठी खेळणी अशी भरपूर खरेदी मोकळ्‌या हातांनी केली. त्यामुळे जाताना वारकर्‍यांचे मन जसे आनंदाने भरले तसेच त्यांच्या बॅगाही खरेदीने भरल्या होत्या