शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारी : माऊलीच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश

By admin | Updated: July 5, 2016 17:58 IST

ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने मंगळवारी गुरू हैबतबाबा यांच्या सातारा या पुण्यभूमीत प्रवेश केला़ तत्पुर्वी माऊलीच्य पादुकांना निरानदीत स्नान घालण्यात आले़

बाळासाहेब बोचरे

लोणंद, दि. ५ : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अखंड हरिनामाची पेरण करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने मंगळवारी गुरू हैबतबाबा यांच्या सातारा या पुण्यभूमीत प्रवेश केला़ तत्पुर्वी माऊलीच्य पादुकांना निरानदीत स्नान घालण्यात आले़दोन दिवस सतत पडणारा पाऊस सोसत मंगळवारी ११ वाजता पालखी सोहळा निरानदीकाठी दुपारच्या विसाव्याला थांबला होता़ पुणे जिल्ह्यातील सुमारे १०० किमीचा महत्वाचा टप्पा पार केला़ पालखीला निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव आले होते़ पुणे जिल्ह्यातील पालखीच्या प्रवासाबद्दल आणि अडचणीबद्दल त्यांनी पालखी व्यवस्थापन व वारकऱ्यांशी चर्चा केली़सातारा जिल्ह्यात वारकऱ्यांचे चैतन्यज्या गुरू हैवतबाबांनी पालखी सोहळा सुरू केला़ त्यांच्या सातारा पुण्यभूमीत मंगळवारी वारकऱ्यांनी पाऊल ठेवताच त्यांच्यामध्ये वेगळेच चैतन्य फुलले़ निरा नदीपार करून सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना वारकऱ्यांनी एका वेगळ्या उत्साहात नाचत नाचत हरीनामात तल्लीन होत सातारा जिल्ह्यात पहिला मुक्काम असलेल्या लोणंद केव्हा गाठले हे कळलेही नाही़ जेजुरी ते लोणंदपर्यंत रस्ता अरूंद आणि चिखलमय असला तरी वारकऱ्यांनी आनंदाने पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला़उद्या उभे रिंगण सोहळाबुधवार ६ जुलै रोजी पालखी सोहळा लोणंद मधून निघणार असून सायंकाळी तरडगावच्या मुक्कामी जाणारआहे़ दरम्यान चांदोबाचा लिंब येथे या सोहळ्यातील पहिले रिंगण सोहळा होणारआहे़सातारा जिल्ह्यात उत्साही स्वागतपुण्याच्या पुरंदर तालुक्यातून साताऱ्यांच्या खंडाळी तालुक्यात मंगळवारी माऊलीच्या प्रवेश केला़ पडिगाव येथे पालखीच्या स्वागताला आ़ मकरंद पाटील, आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जि़प़अध्यक्ष रवी साळुंखे, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, खंडाळा पंचायत समिती सभापती नितीन पाटील आदी उपस्थित होते़ पाडेगावच्या समता आश्रमशाळेच्या मुलांनी लेझीम आणि झांजच्या तालावर माऊलीचे स्वागत केले़ पर्यावरणाचा संदेश देणारे फलक त्यांच्या हातात होते़ शौचालये कुचकामीपालखी सोहळ्यात निर्मलवारीच्या नावाखाली ५०० फिरती शौचालये पाठविण्यात आली आहेत़ पण कुठे गरज आहे आणि कुठे थांबायला हवे याबाबत शौचालय वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकांना योग्य मार्गदर्शन न केल्याने ते कुठेही थांबत असल्याचे आढळून आले़ याबाबत बाळासाहेब चोपदार यांनी चिंता व्यक्त केली़ यावेळी सौरभ राव याबाबत आढावा घेतला जाईल असे सांगितले़