सातारा : ‘लोकमत संस्काराचे मोती’ मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेची अनंत इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आर्या अक्षय पवार ही मानकरी ठरली. तिला लवकरच मुंबई-दिल्ली-मुंबई अशी हवाई सफरची संधी मिळणार आहे.‘लोकमत संस्काराचे मोती - ग्रीन किड्स’ ही स्पर्धा दि. १ जुलै ते ११ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत ‘लोकमत’च्या वतीने घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतून सातारा जिल्ह्यातून एका विद्यार्थ्याला मुंबई-दिल्ली-मुंबई अशी हवाई सफरची संधी मिळणार होती. अखेर या स्पर्धेत अनंत इंग्लिश स्कूलमध्ये सहावी इयत्तेत शिकत असलेली विद्यार्थिनी आर्या पवार हिने बाजी मारली.आर्याला लवकरच मुंबई-दिल्ली-मुंबई अशी हवाई सफरची संधी मिळणार आहे. त्यासोबत दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनाला भेट देणार आहे. ‘हवाई सफर’साठी निवड झाल्याने आर्या व तिच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’चे आभार मानले. या यशाबद्दल आर्याचे मुख्याध्यापक शहाजी देशमुख, शिवाजी राऊत, एस. एस. कुलकर्णी, एस. एम. शेख, जे. एच. जाधव, एस. एन. सुतार, ए. एस. आगलावे, एम. जे. खुडे यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)
आर्या करणार दिल्लीची ‘हवाई सफर’
By admin | Updated: June 22, 2015 22:19 IST