शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

आदिवासी विद्यार्थ्यांची कलाकृती; बांबूपासून अप्रतिम राख्या!

By admin | Updated: August 14, 2016 20:26 IST

अकोलाच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून, त्यानी बांबूपासून अप्रतिम राख्या तयार केल्या आहेत.

कृषी विद्यापीठाने दिले प्रशिक्षण; विद्यार्थ्यांच्या राख्यांचे आज अकोल्यात प्रदर्शन
 
अकोला : कौशल्य अंगी असेल तर कामाची वानवा नाही, अशी अनेक उदाहरणं जगात आहेत. म्हणूनच शासनदेखील किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम प्रशिक्षणावर भर देत आहे. आदिवसीमध्ये उपजतच कलागुण आहेत. या कलागुणांना वाव देण्यासाठी अकोलाच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून, राखी पौर्णिमेचा सण पाहता प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी निसर्गाशी नाळ जोडत बांबूपासून अप्रतिम राख्या तयार केल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील मुख्यालयात या राख्यांचे प्रदर्शन भरवले जात आहे.
बांबूपासून बनवलेल्या राख्या यावर्षी रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून, मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचा त्यामध्ये समावेश असेल. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत मेळघाटातील धारणी येथे मागील दोन वर्षांपूर्वी या भागातील विद्यार्थ्यांसाठी कृषितंत्र विद्यालय सुरू  केले आहे. येथे विद्यार्थ्यांना वेगवेगळे तंत्रज्ञान प्रशिक्षण, शिक्षण देण्यात येत आहे. येथील ४० आदिवासी विद्यार्थ्यांनी १३ ते १४ आॅगस्ट या दोन दिवसीय राखी व हस्तकला प्रशिक्षण घेतले असून, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील लवादा येथे बांबू केंद्र आहे. येथे विद्यार्थ्यांना हस्तकला व बांबूपासून राखी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. राखीसोबतच बांबूपासून महिलांना वेणीला लावण्यात येणारे किल्पस, चिमटा व इतर साहित्य तयार केले आहे. 
 धारणी येथील कृषितंत्र विद्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.आर.टी. रघुवंशी, डॉ.एस.के. बुुरघाटे, कृषी सहायक नीलेश भगत आणि  तुषार कानडी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रशिक्षणात प्रथम आणि व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
- मेळघाटात रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न
आदिवासी बांधवामध्ये उपजत कलागुण आहेत. त्या कलागुणांचा वापर रोजगारनिर्मिती केल्यास मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी, येथील नागरिक यांना रोजगार उपलब्ध होईल. परिणामी त्यांचे शहराकडे होेणारे स्थलांतर थांबेल. त्यादृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी येथे कृषितंत्र विद्यालय सुरू  केले आहे. येथील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे.
 
 
निसर्गाशी नाळ जोडत आदिवासी विद्यार्थ्यांनी अप्रतिम राख्या व इतर साहित्य तयार केले आहे. त्यांच्या या निसर्ग वस्तूंचे १५ आॅगस्टला कृषी विद्यापीठात प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
डॉ. किशोर बिडवे,
 कुलगुरू चे तांत्रिक सचिव,
डॉ. पंदेकृवि, अकोला.