शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कलाकार आजन्म कलेसाठीच झटतो

By admin | Updated: May 21, 2016 00:48 IST

कलाकार प्रत्येक क्षणाला कला जगत असतो. त्याला मिळणारी प्रसिद्धी अत्यंत क्षणिक असते.

पुणे : कलाकार प्रत्येक क्षणाला कला जगत असतो. त्याला मिळणारी प्रसिद्धी अत्यंत क्षणिक असते. त्यामुळे प्रसिद्धीच्या हव्यासापेक्षा बालकलाकारांवर कलेचे संस्कार होणे गरजेचे असते. कलावंत आतून व्यक्त झाला, की रसिक हमखास दाद देतात. कलाकाराला भाषा, देशाचे बंधन नसते. कुटुंबाच्या, मायबाप प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर तो कलेवर आजन्म प्रेम करतो. मलाही कलेचे जतन करतच मरण यावे, असे मत अभिनेत्री क्रांती रेडकर हिने व्यक्त केले. नटरंग अ‍ॅकॅडमीतर्फे यंदाचा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार क्रांती रेडकर यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला, त्या वेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, मधू कांबीकर, सीमा सरदेशपांडे, किरण सरदेशपांडे, जतिन पांडे, संस्थेचे पदाधिकारी ललित जैन, गिरिजा बापट, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, दिलीप काळोखे, धनंजय जाधव, बाळासाहेब दाभेकर, महेश लडकत आदी उपस्थित होते. गिरीश बापट म्हणाले, ‘‘कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना मेहनत, सचोटी आणि जिद्दीच्या जोेरावर यश मिळवणाऱ्या क्रांतीसारख्या कलाकारांचे कौतुक वाटते. प्रेक्षकांना पडद्यावर कलाकार कला सादर करताना दिसतात; पण यासाठी पडद्यामागे बरीच मेहनत घ्यावी लागते. कलाक्षेत्राचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. मेहनती कलाकारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनच भविष्यातील कलाकारांची पिढी घडू शकते.’’पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दादा पासलकर, कांचन अधिकारी आदी मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. अथर्व कर्वे आणि वैष्णवी गिरे यांनी सूत्रसंचालन केले. किरण सरदेशपांडे यांनी प्रास्ताविक केले. जतिन पांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)