शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० वरून सेनेचे सरकारला चिमटे

By admin | Updated: March 3, 2015 00:43 IST

जम्मू-काश्मीर सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रसंगी कलम ३७० सारखा पारंपरिक मुद्दा बाजूला ठेवून तडजोड करणाऱ्या भाजपवर मित्र पक्षांकडून जोरदार टीका होत आहे़

जयशंकर गुप्त - नवी दिल्लीजम्मू-काश्मीर सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रसंगी कलम ३७० सारखा पारंपरिक मुद्दा बाजूला ठेवून तडजोड करणाऱ्या भाजपवर मित्र पक्षांकडून जोरदार टीका होत आहे़ सोमवारी केंद्रात व महाराष्ट्रात भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनने यानिमित्ताने मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले़ जम्मू- काश्मिरात कलम ३७० बाबत सरकारने काय कारवाई केली? असा खोचक प्रश्न सेनेने राज्यसभेत उपस्थित केला़राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेच्या क्रमात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकारला घेरले़ राऊत यांनी मोदी सरकारला सर्वांसाठी समान नागरी कायदा व कलम ३७० चे स्मरण करून दिले़ अभिभाषण सरकारने केलेल्या किंवा भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्यांची प्रस्तावना-आराखडा असते, असे सांगत ते म्हणाले की, कायदा आणि राज्यघटनेनुसार सर्वांकडे समान भावनेतून बघितले गेले पाहिजे, हे समान नागरी कायद्याचे मूळ तत्त्व आहे़ आम्ही सर्व सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’सोबत आहोत आणि सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे़ मात्र देशातील विविध भागांत शरणार्थ्यांचे जीवन जगणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या समस्या, त्यांची घरवापसी याबाबतही सरकारने ठोस पावले उचलायला हवीत़४जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची भाजपाची पूर्वापार मागणी राहिलेली आहे़ मात्र जम्मू-काश्मिरात पीडीपीसोबत सत्तेत सहभागी होताना भाजपाने कलम ३७० चा मुद्दा थंडबस्त्यात टाकला आहे़