शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हिजन आॅफ आर्ट’मध्ये कलासंगम

By admin | Updated: May 18, 2016 02:22 IST

‘व्हिजन आॅफ आर्ट’ या समूह कला प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले

मुंबई : जहांगीर कला दालनात आयोजित ‘व्हिजन आॅफ आर्ट’ या समूह कला प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. या समूह कला प्रदर्शनात चित्र आणि शिल्पांचा अनोखा मेळ साधण्यात आला आहे. ‘व्हिजन आॅफ आर्ट’ या समूह कला प्रदर्शनात संदीप पाटील, सुषमा अदाते, किरण अदाते यांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. याप्रसंगी, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी या कलाकृती पाहून कलाकारांना मनमुराद दाद दिली. शिवाय, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.वांद्रे रहेजा महाविद्यालयातून कलेचे शिक्षण पूर्ण करणारे संदीप पाटील गेली नऊ वर्षे कला अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. या प्रदर्शनात समुद्र पाऊस, प्रतिबिंब अशा विविध विषयांवर संदीप यांनी चित्रे रेखाटली आहेत. या चित्रातील रेखाटन कला रसिकांचे लक्ष वेधत आहे. सुषमा अदाते यांनी ‘गॉसिप’ या विषयावर शिल्पे साकारली आहेत. याकरिता, धातूचा वापर करून अत्यंत वैविध्यपूर्ण पद्धतीने ही शिल्पे साकारली आहेत. सुषमा यांनी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट या संस्थेतून कला शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या माहीम येथील एका खासगी शाळेत त्या कलेचे अध्यापन करतात. या प्रदर्शनात मांडण्यात आलेली ही धातूची शिल्पे वेगवेगळ्या दृश्यांमध्ये गॉसिपिंग करताना आढळतात. त्यात वर्तमानपत्र-पुस्तक वाचताना रंगणारे गॉसिप, कट्ट्यावरचे गॉसिप अशा वेगवेगळ्या दृश्यांना शिल्परूपात साकारले आहे. किरण अदाते यांनी ‘जर्नी आॅफ लाइफ’ या विषयावर शिल्पे साकारली आहेत. यासाठी दगडाचा वापर करून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, ममता या भावनांना मूर्त रूपात साकारले आहे. ‘व्हिजन आॅफ आर्ट’ हे कलाप्रदर्शन जहांगीर कलादालनाच्या आॅडिटोरिअम सभागृहात २३ मेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील. या प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आहे. (प्रतिनिधी)