शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘कला अंगण’ अद्याप अनावरणाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 18, 2016 02:08 IST

जे. जे. कला महाविद्यालयाच्या संकुलात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘कला अंगण’ (डिस्प्ले स्ट्रक्चर) गेल्या महिनाभरापासून उभारण्यात आला

लीनल गावडे/

मुंबई- जे. जे. कला महाविद्यालयाच्या संकुलात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘कला अंगण’ (डिस्प्ले स्ट्रक्चर) गेल्या महिनाभरापासून उभारण्यात आला आहे. मात्र बांधकाम पूर्ण होऊन देखील त्याच्या अनावरणाला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून ही वास्तू अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे.विद्यार्थ्यांच्या कलांना चालना मिळावी यासाठी सर जे. जे कला महाविद्यालयाच्या संकुलात ‘डिस्प्ले स्ट्रक्चर’ गेल्या महिनाभरापासून उभारण्यात आला आहे. जे. जे. संकुलात प्रवेश केल्यानंतर येथे उभारण्यात आलेला डिस्प्ले स्ट्रक्चर नजरेस पडतो. संकुलाबाहेरून जाणाऱ्यांनाही तो दिसावा, अशा पद्धतीने त्याची मांडणी करण्यात आलेली आहे. हा डिस्प्ले अनावरणाच्या पाटीसह तयार आहे. या अनावरणाची पाटी सध्या झाकून ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कलांचे सादरीकरण करण्यासाठी हे स्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे बांधकाम करण्यात आले असून, याद्वारे कलामहाविद्यालयात होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती लावण्यात येणार आहे. जे. जे. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलांचे सादरीकरण या डिस्प्लेद्वारे केले जाणार असल्याची माहिती जे. जे. कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव मिश्रा यांनी दिली. या स्ट्रक्टरचे अनावरण जून महिन्याच्या शेवटपर्यंत होणे अपेक्षित होते, पण काही परवानगींमुळे हा प्रकल्प रखडला गेला असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी उभारलेला हा डिस्प्ले स्ट्रक्चर परवानग्यांच्या अभावी रखडला असून, जुलै महिन्यात तरी अनावरण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.>झाड कोसळल्याने वाहतूककोंडी