शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे शहरात आगमन

By admin | Updated: June 18, 2017 18:57 IST

पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी पालखी मार्गावर गर्दी केली.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 18 -  टाळ मृदुंगाचा गजर ... माऊलीच्या नामाचा जयघोष... पंढरीच्या दिशेने पडणारी लाखो पाऊले... आकाशी फडकणा-या पताका... रस्त्याच्या दूतर्फा उभे असलेले भाविक... अशा मंगलमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीहून तर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूहून पुण्यात आगमन झाले. पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी पालखी मार्गावर गर्दी केली.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे कळस येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. पुण्याचा महापौर मुक्ता टिकळ, उपमहापौर सिध्दार्थे धेंडे यांनी माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. या प्रसंगी नगरसेवक अनिल टिंगरे,किरण जठार ,पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्यानबा-तुकारामचा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास बोपोडी येथे आगमन झाले. तुकाराम महाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्याने शनिवारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. महापालिकेने बोपोडी थेथे स्वागत कक्ष उभारला होता. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,आमदार विजय काळे, प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक विजय शेवाळे,नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेविका स्वप्नाली सायकर,ज्योती कळमकर, सुनीता वाडेकर,अर्चना मुसळे, सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी पालखीचे स्वागत केले. मुख्य पालखी मार्गाबरोबरच शहरातील भागात वारक-यांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले. पुण्यातील विविध स्वयंसेवी संस्था व सर्व सामान्य नागरिकांडून वारक-यांना अन्न दानाचे व आवश्यक वस्तूंचे वाटप केले. लहान थोरांपासून ज्येष्ठ पुरूष व महिला दोन्ही पालख्यांमध्ये भक्तीभावाने सहभागी झाले. पालखी सोहळ्यातील तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. वारक-यांची सेवा करण्याबरोबरच तरुणाई पालखी मार्गावर सफाई करताना दिसत होती.