शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

पेणमध्ये साखरचौथ गणरायाचे जल्लोषात आगमन

By admin | Updated: September 19, 2016 02:48 IST

संकष्ट चतुर्थी अर्थात साखरचौथ गणरायांच्या उत्सवाची धूम दोन दिवस रंगणार आहे.

पेण : संकष्ट चतुर्थी अर्थात साखरचौथ गणरायांच्या उत्सवाची धूम दोन दिवस रंगणार आहे. रविवारी उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच पेणमध्ये उत्सव मंडपात बाप्पांना आणण्यासाठी मिरवणुकांची लगबग पहावयास मिळाली. साखरचौथ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्ती कार्यशाळांमधून मूर्ती घेऊन उत्साही वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला मंडपात नेले. बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकांचा जल्लोष रविवारी सायंकाळी पेणमध्ये पहावयास मिळाला. एकंदर उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच भक्तिमय वातावरणासह कार्यकर्त्यांचा आनंद शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसून आले. साखरचौथच्या गणरायाच्या उत्सवाची क्रेझ पेण, उरण, पनवेल, अलिबागमधील आगरी कोळी समाजात गेल्या दशकभरात वाढली आहे. याचबरोबर गणेशमूर्तीकार व अन्य नवसाचे बाप्पा साखरचौथ संकष्टीनिमित्त उत्साहाने बसविले जातात. याचबरोबर २१ दिवसांच्या बाप्पाचा सुद्धा या उत्सवामध्ये समावेश होतो. पेण शहरात एकूण ६८ साखरचौथ गणराय असून यामध्ये २४ सार्वजनिक मंडळाचे आहेत. तर ग्रामीण भागात खारपाट विभागातील ४२ गावांमध्ये प्रत्येकी दोन सार्वजनिक मंडळाचे बाप्पा गावात असतात, तर खाजगी ४०० च्या आसपास गणपती आहेत. एकंदर युवा मंडळाची क्रेझ, बाप्पाच्या सुंदर आकर्षक मूर्ती, नेत्रदीपक आरास ही या उत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. गणरायांची विधिवत गुरुजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना सोमवारी होणार आहे. त्यानंतर विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल दोन दिवस रंगणार आहे.ढोल - ताशे पथकाने बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक जल्लोषात काढली. कासार आळीच्या राजा दरवर्षी कलात्मक अशी बाप्पाची मूर्ती साकारून गणेशभक्तांना आकर्षित करते. याशिवाय अनेक नामवंत मंडळांच्या मूर्तीचा कलाविष्कार साखरचौथ बाप्पाचा उत्साहात पहावयास मिळतो. (वार्ताहर)>जल्लोष साखरचौथच्या गणेशोत्सवाचा नागोठणे : भाद्रपद कृ.चतुर्थीनिमित्त होणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सवास शहरासह विभागात सोमवारपासून प्रारंभ होत आहे. विभागातील शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे पळस येथील मंदिरात सुद्धा हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. सकाळी ९ वाजता किरण वेखंडे यांच्या पौरोहित्याखाली पोलीस पाटील बबन शिंदे दाम्पत्याच्या हस्ते श्रींच्या प्रतिष्ठापनेने या धार्मिक सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. सकाळी १० वाजता महाआरती होणार आहे.दुपारी १२ ते ४ पारंपरिक नृत्याचा सामना रंगणार आहे. यावेळी गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे मान्यवर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मंडळाचे वतीने गौरविण्यात येणार आहे. मंगळवारी २० सप्टेंबरला दुपारी१२ वाजता महाआरती व त्यानंतर दुपारी ३ वाजता विसर्जनासाठी गणेशमूर्तीचे प्रस्थान होणार असून सायंकाळी ६ वाजता निडी येथील अंबा नदीत विसर्जन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.