शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरीत २०० दींड्यांचे आगमन

By admin | Updated: February 21, 2017 19:22 IST

श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळी कोथळी-मुक्ताईनगर येथे जुन्या व नवीन मंदिरावर ध्वजपूजनाने श्री संत मुक्ताई यात्रोत्सवात सुरुवात झाली.

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, दि. 21 -  श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळी कोथळी-मुक्ताईनगर येथे जुन्या व नवीन मंदिरावर ध्वजपूजनाने श्री संत मुक्ताई यात्रोत्सवात सुरुवात झाली. संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करून यात्रोत्सवाची सुरुवात झाली. प्रसंगी संस्थानचे विश्वस्त व व्यवस्थापक रवींद्र हरणे, उद्धव जुनारे उपस्थित होते.

माघ कृष्ण दशमीपासून दरवर्षी श्री संत मुक्ताबाईची यात्रा सुरू होते. केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भ, खान्देश, मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर दींड्यांचे आगमन मुक्ताईनगरीत होत असते. आजपावेतो नवीन मंदिरावर जवळपास १०० दींड्या तर जुन्या मंदिरावर १५ दींड्यांचे आगमन झाले आहे. दींड्यांचे आगमन माघ एकादशी म्हणजेच बुधवारपर्यंत होत असते. यावर्षी जवळपास २०० च्या वर दींड्यांचे आगमन अपेक्षीत आहे. यात्रोत्सवानिमित्त नगरपरिक्रमा हा आकर्षणाचा विषय ठरणार असून सर्व दींड्या एकादशीनिमित्त नगर परिक्रमा करून जुन्या व नवीन मंदिरात स्थानापन्न होतील. संत मुक्ताई संस्थानसाठी ६० पुरुष व ३० महिला सेवेकरी मंदिरात सेवा देत आहेत. रात्री सुभाष महाराज (मनूर) यांचे कीर्तन झाले.

एकादशीच्या दिवशी महानंदाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात येणार आहे. संस्थानतर्फे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील हे पूजेचे मानकरी आहेत. मंगळवारचे अन्नदान माणिकराव पाटील मनुरकर यांनी केले आहे. एकादशीनिमित्त मुक्ताई संस्थान (नवीन मंदिरात तर जुने मंदिरात सीताराम तेली, वरणगाव, शाम व्यवहारे, जळगाव, अशोक पाटील, टाकळी, ता.जामनेर यांच्यातर्फे ६ क्विंटल साबुदाणा फराळ देण्यात येत आहे. जुन्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असल्याने काही प्रमाणात असुविधा असल्यातरी नवीन मंदिराची उत्सुकता वारकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. मंदीरांवरील आकर्षक: रोषणाईने फेडले डोळ्याचे पारणेश्री मुक्ताबाई संस्थान कोथळी व मुक्ताईनगर येथील मंदीरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.संस्थानतर्फे भाविकांच्या सोयीसाठी दर्शन बारी मंडप, शामीयाना, पिण्याचे पाणी महाप्रसाद फराळ आदी सोयीसुविधा करण्यात आलेल्या आहेत शिवाय मान्यवर महाराज मंडळी हभप निवृत्ती महाराज वक्ते हभप संदीपन महाराज,पुंजाजी महाराज परमेश्वर महाराज, रामशंकर महाराज,रविंद्र महाराज, प्रल्हाद महाराज आदींची कीर्तन, प्रवचने होतील. प्राणप्रिय शिष्य योगी चांगदेवाच्या भेटीसाठी आई मुक्ताई वारकरी मेळ्यासह महाशिवरात्री २४ रोजी जातील मुक्ताबाई कडून मानाची पूजा यावेळी करण्यात येईल. लाखोच्या संख्येने येणारे भाविक लक्षात घेवून कोथळी-मुक्ताईनगर-चांगदेव ग्रामस्थ ग्रामपंचायत व सेवा संस्था संघटना नियोजन करीत आहे.भाविक भक्तांच्या सोयीसाठी संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील यांनी केले आहे