शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आरेची मुंबईला पुन्हा ‘एनर्जी’

By admin | Updated: April 28, 2017 03:33 IST

गेल्या काही महिन्यांपासून दूधविक्री केंद्रांवरून गायब झालेले आरेचे ‘एनर्जी’ हे सुगंधित दूध पुन्हा उपलब्ध होणार असून तसे आदेश

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून दूधविक्री केंद्रांवरून गायब झालेले आरेचे ‘एनर्जी’ हे सुगंधित दूध पुन्हा उपलब्ध होणार असून तसे आदेश पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले आहेत.आरेच्या ‘एनर्जी’ दुधाला मुंबईत प्रचंड मागणी होती. विशेषत: रुग्णालये, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी या बाटलीबंद सुगंधित दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असे. असे असताना या दुधाचे उत्पादन अचानक थांबविण्यात आले. त्यामुळे मुंबईतील आरेच्या १८०० दूधविक्री केंद्रांवर खासगी कंपन्यांचे दूध विकले जात आहे. खासगी कंपन्यांचे सुगंधित दूध बाजारात येताच आरेचे ‘एनर्जी’ बंद झाले, हा योगायोग नक्कीच नव्हता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच मंत्री जानकर यांनी दुग्धविकास खात्यातील अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेऊन चांगलीच कानउघाडणी केली. तसेच खासगी कंपन्यांऐवजी सरकारच्या ‘एनर्जी’ दुधाला ग्राहकांची चांगली मागणी असताना हा ब्रॅण्ड बंद करणे योग्य ठरणार नाही, अशी मागणी आरेच्या दूधविक्री केंद्र चालकांनी मंत्री जानकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार ‘एनर्जी’ दुधाचे उत्पादन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दुग्धविकास खात्याने घेतला असून कुतवळ फूड प्रॉडक्टमार्फत हे दूध लवकरच बाजारात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)