शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीरपणे शस्त्र विकणाऱ्यास अटक

By admin | Updated: June 10, 2016 02:49 IST

खांदेश्वर रेल्वे स्टेशनसमोर रिव्हॉल्व्हर व गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या अनिल औधराज चौहान या आरोपीस गुन्हे शाखेने अटक केली

नवी मुंबई : खांदेश्वर रेल्वे स्टेशनसमोर रिव्हॉल्व्हर व गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या अनिल औधराज चौहान या आरोपीस गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून १ रिव्हॉल्व्हर, ६ गावठी कट्टा व ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे अधिकारी किरण भोसले यांना शस्त्रविक्री करण्यासाठी एक आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ७ जूनला सापळा रचून पोलिसांनी अनिल चौहानला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे १ रिव्हॉल्वर, ६ गावठी कट्टे व ५ काडतुसे असा एकूण ७७ हजार रूपये किमतीचा ऐवज सापडला आहे. आरोपी मूळचा उत्तरप्रदेशमधील रहिवासी असून सद्यस्थितीमध्ये मानखुर्द मंडाला परिसरात वास्तव्य करत आहे. त्याच्यावर मुंबईमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, जबरी दुखापत व एनडीपीएस अ‍ॅक्टप्रमाणे ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपआयुक्त दिलीप सावंत, सहायक आयुक्त नितीन कौसाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपीने यापूर्वी अजून कोणाला शस्त्र पुरविली आहेत. गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे याचा तपास सुरू आहे.७७ हजारांचा ऐवज सापडलादेशी बनावटीचे १ रिव्हॉल्व्हर, ६ गावठी कट्टे व ५ काडतुसे असा एकूण ७७ हजार रूपये किमतीचा ऐवज सापडला आहे. आरोपी मूळचा उत्तरप्रदेशमधील रहिवासी असून सद्यस्थितीमध्ये मानखुर्द मंडाला परिसरात वास्तव्य करत आहे.