शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आमदार रमेश कदम यांचे अटकनाट्य

By admin | Updated: July 5, 2015 01:49 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्याविरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर नेलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले.

मोहोळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्याविरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर नेलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी जमावाने पोलीस ठाण्यावर केलेल्या दगडफेकीत आ. कदम यांच्यासह १२ पोलीस जखमी झाले. याप्रकरणी कदम यांच्यासह ४३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ प्रत्यक्षात ‘अटक करणार नाही’, असे पोलिसांनी लिहून दिलेले असतानाही आ. कदम यांनी हे अटकनाट्य घडवून आणले. शहरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या हायवे पुलाखालील रस्ता अरुंद असल्याने नागरिकांच्या सूचनेनुसार २८ जून रोजी रमेश कदम यांनी तेथील जाळी जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढली़ मोहोळ पोलीस ठाण्यात आ़ कदम यांच्यासह तिघांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सांगत अटक करून घेण्यासाठी शनिवारी आ़ कदम हजारो कार्यकर्त्यांसह मोर्चाने मोहोळ पोलीस ठाण्यात आले. या वेळी पोलिसांनी जमावाला बाहेरच अडविले. मात्र कदम यांना ताब्यात घेतल्यावर जमावाने पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी पोलिसांनी लाठी चार्ज केला, तर जमावानेही जोरदार दगडफेक केली.जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळेच हा प्रकार घडला आहे़ नागरिकांच्या सोयीसाठी काढलेल्या जाळीचा गुन्हा कसा होऊ शकतो? येत्या पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडून या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार आहे़- रमेश कदम, आमदारतुम्हाला अटक करणार नाही, असे पत्र आम्ही आ़ रमेश कदम यांना दिले होते़ तरीही अटक करून घेण्यासाठी ते मोर्चा घेऊन पोलीस ठाण्यावर आले़ त्यामुळेच हा प्रकार घडला़- दिलीप चौगुले, पोलीस उपअधीक्षक