देऊळगाव राजा (जि. बुलडाणा): गावशिवार नकाशा आणि इतर कागदपत्रांची नक्कल देण्यासाठी शेतकर्याकडे ३४0 रुपयांची लाच मागणार्या येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी भीमराव कोंडू वानखेडे याला बुलडाणा लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई ३0 जून रोजी दुपारी करण्यात आली. देऊळगाव राजा तालुक्यातील गाळेगाव येथील शिवाजी त्र्यंबक बरडे यांनी तक्रारी दिली, की त्यांची तुळजापूर शिवारात शेतजमीन असून, न्यायालयीन कामकाजासाठी गावशिवार नकाशा व इतर कागदपत्रांची त्यांनी देऊळगाव राजा उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात मागणी केली होती. दरम्यान, सदर कागदपत्रे देण्यासाठी कार्यालयातील दप्तरबंद वर्ग ४ कर्मचारी भीमराव कोंडू वानखेडे यांनी बरडे यांच्याकडे ३४0 रुपयांची मागणी केली. सदर तक्रारीच्या आधारे ३0 जून रोजी बुलडाणा लाचलुचपत विभागाच्या पथकाने देऊळगाव राजा उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचला. या दरम्यान, शिवाजी त्र्यंबक बरडे यांच्याकडून कर्मचारी भीमराव वानखेडे याला ३४0 रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहात अटक केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूमिअभिलेखच्या कर्मचा-याला अटक
By admin | Updated: July 1, 2016 00:40 IST