शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एनएसयूआयच्या मुंबई अध्यक्षाला अटक

By admin | Updated: May 25, 2015 04:03 IST

घाटकोपरमध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी एनएसयूआयचा मुंबई अध्यक्ष विपिन सिंगसह त्याच्या तीन साथीदारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

मुंबई : घाटकोपरमध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी एनएसयूआयचा मुंबई अध्यक्ष विपिन सिंगसह त्याच्या तीन साथीदारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तर तीन साथीदार पसार झाले असून त्यांचा तपास सुरू आहे.विपीन सिंगसह साथीदार सुमित सिंंग (२१), विकास उपाध्यय (२७), सिद्धार्थ जयसिंग संपत (३०) या चौघाही आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडीत सुनावण्यात आल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त विनयकुमारराठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घाटकोपर पोलीस ठाण्यात निगराणी पथकाचे प्रमुख असलेले पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे हे त्याचे साथीदार दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख असलेले पोलीस उपनिरीक्षक भूषण पवार यांच्यासोबत शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घाटकोपरच्या हवेली ब्रिजजवळ अ‍ॅन्टी चेन स्नॅचिंग पॉइंटवर साध्या वेषात गस्त घालत होते. यावेळी एनएसयूआयचा पदाधिकारी असलेला सुमित सतीश सिंग (२१) हा मोटारसायकलने चुकीच्या दिशेने आल्याने शिंदे यांनी त्याला अडविले. त्याच्याकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली. उलट प्रश्न करीत सिंग त्यांच्या अंगवार धावून गेला. इतर सहकारीही पोलिसांच्या अंगावर धावून आले. या वेळी ‘आम्ही पोलीस आहोत’ असे सांगून पोलिसांनी ओळखपत्रही दाखविले. सिंग याने तत्काळ विपिन सिंगला कॉल करून पोलिसाशी वाद झाल्याचे सांगितले. अवघ्या काही मिनिटांतच विपिन सात साथीदारांसह घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांना काही कळण्याच्या आतच विपिन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. काहींनी तर बेल्ट काढून त्यांना बेदम मारहाण केली. पावणेदहाच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, सातपैकी चार जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या तर इतर तिघांनी पळ काढला. जखमी पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)