शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कागदपत्रांच्या आधारे कंपनी ताब्यात घेणाऱ्याला अटक

By admin | Updated: September 24, 2016 02:34 IST

सफल ग्रुप कंपनीची आपल्या नावाने नोंदणी करून फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या गोविंद जाधवानी (५६) या माजी संचालकाला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली

मुंबई : बोगस कागदपत्रांच्या आधारे सफल ग्रुप कंपनीची आपल्या नावाने नोंदणी करून फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या गोविंद जाधवानी (५६) या माजी संचालकाला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. जाधवानी हे सफल ग्रुपचे माजी संचालक आहेत. गोवंडी येथे राहणारे वरुण असराणी यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा बांधकाम व्यवसायासह रिअल एस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीची सफल ग्रुप नावाची कंपनी असून १५ वर्षांपासून जाधवानी कंपनीचे संचालक होते. ३० मार्च २०१५ रोजी निवृत्त झाला. या वेळी नियमानुसार येणारी रक्कम कंपनीकडून देण्यात आली होती. मात्र निवृत्तीनंतर जाधनावी यांनी सफल ग्रुप कंपनी आपल्या मालकीची असल्याची बनावट कागदपत्रे आणि लोगो तयार करून त्याची नोंदणी केली होती. कंपनीशी वरूण असराणी व त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता. गेल्या वर्षी हा प्रकार वरुण असराणी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेऊन जाधवानीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत १५ वर्षे कंपनीत काम करताना अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारे कंपनीचे ट्रेड मार्क आपल्या नावावर करून घेतले होते. त्यानंतर आपण कंपनीचे सर्वेसर्वा असल्याचे जाधवानी याने सांगायला सुरुवात केली.