शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
4
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
5
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
6
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
7
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
8
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
9
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
10
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
11
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
12
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
13
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
14
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
15
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
16
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
17
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
18
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
19
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
20
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

पक्षांतर्गत गद्दारांचा बंदोबस्त करा!

By admin | Updated: June 21, 2017 17:16 IST

पक्षांतर्गत गद्दारांचा बंदोबस्त करा, अशी गळ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घातली.

कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळे यांना गळ : संवाद कार्यक्रमात उफाळून आले राष्ट्रवादीतील मतभेदवाशिम : गत नगर पालिका निवडणूकीत पक्षांतर्गत बंडाळी आणि गद्दारांनी छुप्या मार्गाने विरोधकांची साथ दिल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसला दारूण पराभवाचे तोंड पाहावे लागले. पक्ष वाढीसाठी अत्यंत धोकादायक ठरू पाहणारी ही बाब लक्षात घेवून सर्वप्रथम पक्षांतर्गत गद्दारांचा बंदोबस्त करा, अशी गळ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घातली. २१ जून रोजी स्थानिक जैन भवनात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्यसंवादह्ण कार्यक्रमात पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी खासदार सुळे यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, माती जिल्हाध्यक्ष पांडूरंग ठाकरे, बाबाराव खडसे, दिलीप जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपापले मत व्यक्त करताना सांगितले, की जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूकदरम्यान स्थिती सकारात्मक असतानाही ऐनवेळी पक्षातीलच काही मंडळींनी गद्दारी केल्याने पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. वाशिममध्ये पक्षाचे ३० पैकी केवळ २ नगरसेवक निवडून आले. हीच स्थिती जिल्ह्यातील इतरही नगर परिषदांमध्ये राहिली. त्यामुळे प्रथम पक्षातील अशा गद्दारांना निवडून त्यांना बाजूला करावे लागेल, तेव्हाच पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. इतरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत बंडाळीविषयी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करून जे कार्यकर्ते इमानेइतबारे पक्षाचे काम करतात, त्यांना उमेदवारी मिळावी, त्यांच्या प्रगतीसाठी पक्षाने झटायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.