शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर्गत गद्दारांचा बंदोबस्त करा!

By admin | Updated: June 22, 2017 04:22 IST

कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळे यांना गळ; संवाद कार्यक्रमात उफाळून आले राष्ट्रवादीतील मतभेद.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत नगरपालिका निवडणुकीत पक्षांतर्गत बंडाळी आणि गद्दारांनी छुप्या मार्गाने विरोधकांची साथ दिल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात दारूण पराभवाचे तोंड पाहावे लागले. पक्ष वाढीसाठी अत्यंत धोकादायक ठरू पाहणारी ही बाब लक्षात घेऊन सर्वप्रथम पक्षांतर्गत गद्दारांचा बंदोबस्त करा, अशी गळ पक्षाच्या कार्यकर्त्यांंंनी खासदार सुप्रिया सुळे यांना घातली. २१ जून रोजी स्थानिक जैन भवनात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्यसंवादह्ण कार्यक्रमात पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी खासदार सुळे यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग ठाकरे, बाबाराव खडसे, दिलीप जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांंंंनी आपापले मत व्यक्त करताना सांगितले की, जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूकदरम्यान स्थिती सकारात्मक असतानाही ऐनवेळी पक्षातीलच काही मंडळींनी गद्दारी केल्याने पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. वाशिममध्ये पक्षाचे ३0 पैकी केवळ २ नगरसेवक निवडून आले. हीच स्थिती जिल्ह्यातील इतरही नगर परिषदांमध्ये राहिली. त्यामुळे प्रथम पक्षातील अशा गद्दारांना बाजूला करावे लागेल, तेव्हाच पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. इतरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांंंनी पक्षांतर्गत बंडाळीविषयी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करून जे कार्यकर्ते इमानेइतबारे पक्षाचे काम करतात, त्यांना उमेदवारी मिळावी, त्यांच्या प्रगतीसाठी पक्षाने झटायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतक-यांच्या प्रश्नांवर झाली चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या संवाद कार्यक्रमात विशेषत्वाने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांंंंनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. वाशिम जिल्ह्याची नाळ शेतीशी जुळलेली असून, येथील ८0 टक्के जनतेचा मुख्य व्यवसाय शेती आहे. असे असताना सर्वाधिक समस्या शेतकर्‍यांनाच भेडसावत असून, त्या निकाली काढण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली.