शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर-देवणीत रात्रीतून फोडली १४ दुकाने

By admin | Updated: December 26, 2016 17:21 IST

उदगीर आणि देवणी शहरातील तब्बल १४ दुकाने एकाच रात्रीतून चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे.

ऑनलाइन लोकमतउदगीर, दि. 26 - उदगीर आणि देवणी शहरातील तब्बल १४ दुकाने एकाच रात्रीतून चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे. यात लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला. एकट्या देवणी शहरातच १० दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. तर उदगीरच्या मोंड्यातील ४ अडत दुकाने चोरट्यांनी फोडली. मात्र येथे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.देवणी शहरातील उदगीर-निलंगा राज्यमार्गापासून ते मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरील प्रमुख दुकाने चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास फोडली. थंडीचा कडाका वाढल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी एकापाठोपाठ मुख्य बाजारपेठेत धुमाकूळ घातला. त्यात प्रामुख्याने ज्वेलरीतून मोठा ऐवज गेला आहे. फिर्यादी राजकुमार पंचाक्षरे यांचे मुख्य बाजारपेठ लाईनमध्ये ज्वेलरी दुकान आहे. येथे चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील साहित्याची तोडफोड करीत ५ किलोग्रॅम वजनाचे चांदीचे मोड, तीन किलोग्रॅम चांदी, मोबाईल व काही रोख, असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला आहे. त्यापाठोपाठ बस्वराज काळू यांच्या ज्वेलरीतून रोख १० हजार व ५५ हजार रुपयांचे दागिने असा ऐवज ६५ हजार रुपयांचा चोरीस गेला आहे. महादेव बिरादार यांच्या किराणा दुकानातून रोख ३८०० रुपये चोरीस गेले आहेत. किशोर बेलुरे यांच्या जनरल स्टोअर्समधून रोख ३० हजार व ३५ हजार रुपयांचे मोबाईल व्हाऊचर्स असा ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. रफीक शेख यांच्या मोबाईल दुकानातून १६ हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरीस गेले आहेत. महादेव बेलुरे यांच्या किराणा दुकानातून रोख ५ हजार रुपये व १० हजार रुपये किमतीचे साहित्य असे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविण्यात आला. संतोष चिंद्रेवार यांच्या किराणा दुकानातून रोख १० हजार रुपये, अविनाश धनुरे यांच्या कापड दुकानातून १५०० रुपये चोरीस गेले आहेत.याशिवाय, बाजारपेठेतील साई ज्वेलर्स, श्री ज्वेलर्स, बालाजी ज्वेलर्स, अभिजीत ज्वेलर्स, शिवशक्ती मॉल, तपोवन गिफ्ट सेंटर या दुकानातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र येथे त्यांच्या हाती काही लागले नाही. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात कलम ४५७, ३८०, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक एस. एन. सांगवीकर करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवणी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण करून त्याद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शवान राज्यमार्गापर्यंत जाऊन तेथेच घुटमळले. तपासासाठी दोन पथकेदेवणी शहरातील घडलेल्या दुकानफोडीच्या घटनांनंतर तातडीने दोन तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके आरोपींच्या शोधार्थ बाहेर रवाना झाली आहेत. ठसे तज्ज्ञांकडून क्ल्यू मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच एका सीसीटीव्हीमध्ये दोघांचे चेहरे कैद झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा पाटील यांनी दिली आहे. उदगीरात चोरट्यांचे हात रिकामेउदगीरच्या मोंढ्यातील चार अडत दुकाने चोरट्यांनी फोडली. परंतु एकाही दुकानात त्यांच्या हाती काही लागले नाही़. सकाळी हे अडत्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. मात्र चोरीस काहीच गेले नसल्याने कोणीही तक्रार देण्यास पुढे आले नाही. त्यामुळे पोलिसांत कसलीही नोंद झाली नाही. दरम्यान, शहरातील दुकान फोडीचे प्रकार वाढत चालल्याने कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येत असल्याचे पोलीस उपाधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले.