शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईने त्रस्त ११० कुटुंबांनी आसनगाव सोडले

By admin | Updated: May 14, 2014 02:11 IST

मोठ्याप्रमाणात औद्योगिकीकरणासह शहरीकरणामुळे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तसेच आसनगांव येथे तीव्र पाणी जाणवू लागल्याने येथील रहिवाशी शेवटी पाणीटंचाईला कंटाळून घरे सोडू लागले आहेत.

भरत उबाळेआसनगांव - मोठ्याप्रमाणात औद्योगिकीकरणासह शहरीकरणामुळे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तसेच आसनगांव येथे तीव्र पाणी जाणवू लागल्याने येथील रहिवाशी शेवटी पाणीटंचाईला कंटाळून घरे सोडू लागले आहेत. आसनगांवच्या तुळशी विहार, निर्मल नगर, कुणबी नगर, संभाजीनगर, औद्योगिक वसाहत येथे पाणीटंचाईने गंभीर स्वरु प धारण केले आहे. आसनगांव नळपाणीपुरवठा योजना कोलमडून पडली आहे. पाणीटंचाईला त्रासलेले रहिवाशी येथील वास्तव्य सोडून अन्यत्र स्थलांतर करु लागले आहेत. आता पर्यंत ११० घरांना कुलूप लागले आहे़ शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आऱ डी़ धादवड म्हणाले की, शहरीकरण वाढीस लागल्याने येथील पाण्याची गरज वाढली आहे़ मात्र, यासाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी स्थगित आहे़आसनगांव औद्योगिक वसाहतीत पाच हजाराहून अधिक कारखाने असून आम्हांला नळजोडणी नाही़ पाण्याअभावी आमचे उद्योग संकटात आले आहेत़ अनेक उद्योग स्थलांतरीत होत आहेत़ आमच्या प्रश्नांसाठी राजकीय नेत्यांना वेळ नाही, असा आरोप शहापूर मॅन्युफॅˆरर्स असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी विनोद विशे यांनी केला. ( वार्ताहर)--* जमिन विकसित करु न घरे विकणार्‍या बिल्डरांना येथे पाणीटंचाईचा जोरदार फटका बसला आहे. * आसनगांव मध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होऊनही औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे २० वर्षापासून अद्याप नळजोडणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील कारखानदार गेली २० वर्षे खासगी टँकरचेच पाणी वापरीत आहेत़ * पाणी टंचाईत होरपळणार्‍या रहिवाशांना, बिल्डरांसह लघु उद्योजकांना खाजगी टँन्करने होणा-या पाणीपुरवठ्याचा आसरा घ्यावा लागत असल्याने टँन्कर लॉबीचे येथे वर्चस्व वाढले आहे.