शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

देशाच्या एकात्मतेत लष्कराची भूमिका महत्त्वाची - सी. विद्यासागर राव

By admin | Updated: May 29, 2017 19:45 IST

देशाच्या एकात्मतेत आणि बांधणीत लष्कराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण जगाला आज दहशतवादापासून धोका आहे. मातृभूमीच्या संरक्षणाकरिता तुम्ही तयार

ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. 29 - ‘‘देशाच्या एकात्मतेत आणि बांधणीत लष्कराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण जगाला आज दहशतवादापासून धोका आहे. मातृभूमीच्या संरक्षणाकरिता तुम्ही तयार झाला असला तरी या परिस्थितीत तुम्ही शिकलेल्या कोशल्यांचा कस लागणार आहे, यासाठी नवे बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा,’’ असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३२ व्या तुकडीचा सोमवारी पदवीदान सोहळा हबीबुल्लाह सभागृहात दिमाखात पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत  होते. या वेळी एनडीएचे कमांडंट एअरमार्शल जसजितसिंग क्लेर, डेप्युटी कमांडंट रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते. 
या सोहळ्यात बीए, बीएस्सी, बीएस्सी कॉम्प्युटर शाखेच्या ३०८ विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी बहाल करण्यात आली. यातील ६ परदेशी विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बटालियन कॅडेट कॅप्टन आकाश के. आर. याला रौप्यपदक आणि चीफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉॅफीने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर तिन्ही शाखांतून प्रथम राहिल्याबद्दल चीफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीनेही त्याला सन्मानित करण्यात आले. कॉम्प्युटर शाखेत प्रथम आल्याबद्दल कॅडेट कॉटर मास्टर आदित्य निखारा याला रौप्यपदक, तसेच अ‍ॅडमिरल ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. कला शाखेत प्रथम आल्याबद्दल  स्क्वाड्रन कॅप्टन देवेंद्र कुमार कमांडंट रौप्यपदक आणि चीफ आॅफ एअर स्टाफ ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. 
राव म्हणाले, ‘‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने आतापर्यंत देशाला ३५ हजारांहून अधिक लष्करी अधिकारी देशसेवेसाठी दिले आहेत. तीन वर्षांच्या काळात शिस्त, अनुशासन आणि नेतृत्व करण्यास तुम्ही सक्षम झाला आहात. कोशल्यांच्या बळावर तुम्ही अनेक उंची गाठाल. या मार्गात तुमच्यापुढे अनेक आव्हाने असतील. ही आव्हाने सक्षमपणे पेलण्यासाठी नवीन बदल, नवे तंत्र स्वीकारण्याची गरज आहे. हे करताना तुमच्या कौशल्याचा कस लागणार आहे. कुठल्याही देशाची प्रगती ही त्या देशातील शांततेच्या काळात होते. भारतासह संपूर्ण जगासमोर दहशतवादाचे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी तुम्ही सक्षम आहात.’’ 
एनडीएचे कमांडंट एअरमार्शल जसजितसिंग क्लेर म्हणाले, ‘‘तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर देशसेवेसाठी तुम्ही सज्ज झाला आहात. या काळात तुम्ही केलेले ज्ञानार्जन आणि मूल्ये भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी मोलाची ठरतील. या मूल्यांच्या आणि प्रक्षिणाच्या आधारावर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने देशाला प्रगल्भ आणि सक्षम लष्करी अधिकारी देशाला दिले आहेत.’’  
 
देशाचे सार्वभौमत्व टिकवण्याची जबाबदारी सर्वांचीच
कमांडंट एअरमार्शल जसजितसिंग यांनी एनडीएच्या पदवीदान समारंभात नवीन पायंडा पाडत कार्यक्रमानंतर विद्यार्थी आणि पालकांशी थेट संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की प्रत्येक सैनिकाचे देशांच्या सीमांचे संरक्षण करण्याचे स्वप्न असते. या ठिकाणी येणारा प्रत्येक विद्यार्थी हे स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी आलेला असतो. यात पालकांची भूमिका ही महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांना प्रेरणा दिल्यास मुले आपले ध्येय गाठू शकतात. पालकांच्या पे्ररणेमुळेच एनडीएतील खडतर प्रशिक्षण विद्यार्थी पूर्ण करू शकले. देशाचे सार्वभौमत्व जपण्याचे काम फक्त लष्कराचेच नाही. देशातील प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. प्रत्येकाने ते जपले पाहिजे, यासाठी पालकांनीच मुलांना प्रेरित करायला हवे. 
 
फायटर पायलट व्हायचे आहे : आकाश के. आर
एनडीऐत तीन वर्षांत केलेल्या कामगिरीनंतर भारतीय हवाई दलात फायटर पायलट व्हायचे आहे, अशी मनीषा आकाश के. आर. या विद्यार्थ्याने ‘लोकमत’शीी बोलताना व्यक्त केली. आकाश त्रिवेंद्रम येथील असून तो घरातील पहिला लष्करी अधिकारी आहे. त्याच्या वडिलांचे स्वप्न त्याने पूर्ण केले आहे. वडिलांचे लहानपनापासून लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मात्र, आजोबांनी त्यांचा भरलेला अर्ज माघारी घ्यायला लावला. यामुळे वडिलांची लष्करी अधिकारी होण्याची इच्छा अपुरी राहिली. मात्र, एनडीएतील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. वायुदलात पायलट होऊन हवाई सीमेचे रक्षण करणार असल्याने तो म्हणाला.
 
आजोबांचे अधिकारी होण्याचे स्वप्न केले पूर्ण : देवेंद्र कुमार
वयाच्या १२ व्या वर्षी आर्मी स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन घेतले तेव्हापासून लष्करात जाण्याचे स्वप्न होते. आजोबा लष्करातून हॉनररी कॅप्टन म्हणून निवृत्त झाले. वडील सध्या राजस्थानमध्ये हवालदारपदावर लष्करातच आहे. मी लष्करात मोठा अधिकारी व्हावे, अशी आजोबांची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली आहे, असे मत बीए शाखेतून प्रथम आलेल्या देवेंद्र कुमार याने व्यक्त केली. देवेंद्र मूळचा हरियानातील रेवडी जिल्ह्यातील. त्यांच्या घरातील लष्करातील ही तिसरी पिढी आहे. तीन वर्षांत एनडीएमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणामुळे कुठल्याही परिस्थितीत काम करण्यासाठी सक्षम झालो आहोत. पूर्वीपेक्षा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम झाल्याचे देवेंद्र म्हणाला. भविष्यात पायदलात जायचे असल्याचा मानस त्याने व्यक्त केला.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी लेफ्टनंट उमर फयाज यांची क्रूर हत्या केली. उमर फैयाज  आमच्याच बटालियनमधील होते. प्रशिक्षण काळात त्यांना जवळून पाहिले होते. फैयाज अतिशय हसरे आणि उत्साही अधिकारी होते. त्यांची अशी हत्या होणे आमच्यासाठी धक्कादायक बाब आहे. त्यांचे बलिदान आम्ही कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही, असे देवेेंद्र म्हणाला. 
 
एनडीएने शिकवले साहस, धैर्य आणि नीतिमूल्य : आदित्य निखारा
आपला मुलगा लष्करात अधिकारी व्हावा, अशी लहानपणापासून आई-वडिलांची इच्छा होती. त्यामध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली, अशी प्रतिक्रिया रौप्यपदकप्राप्त आदित्य निखारा  याने दिली. आदित्य मूळचा मध्य प्रदेशातील नेवारी येथील आहे. तो म्हणाला, की एनडीएत दाखल झाल्यानंतर अनेक गोष्टी शिकलो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनलो. एनडीएतील तीन वर्षे आव्हाहनात्मक होते. तीन वर्षांच्या काळात ब-याच गोष्टी शिकलो. तीन वर्षांत खूप मेहनत घेतली. प्राध्यापकांनी तसेच प्रशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि जिद्दीमुळे हे प्रशिक्षण पूर्ण करू शकलो. या काळात साहस, धैर्य आणि नीतिमूल्ये शिकलो. भविष्यात लष्कराच्या तोफखाना शाखेत जाण्याचा मानस आदित्यने व्यक्त केला.