शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

सेना युद्धात जिंकली, पण तहात हरली!

By admin | Updated: December 3, 2014 03:52 IST

विधानसभा निवडणुकीत ६३ आमदार जिंकून भाजपाचा अश्वमेध रोखणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्धे युद्ध जिंकले खरे, पण त्यानंतर सत्तेसाठी भाजपापुढे नांगी टाकत सपशेल हार पत्करली.

संदीप प्रधान, मुंबईविधानसभा निवडणुकीत ६३ आमदार जिंकून भाजपाचा अश्वमेध रोखणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्धे युद्ध जिंकले खरे, पण त्यानंतर सत्तेसाठी भाजपापुढे नांगी टाकत सपशेल हार पत्करली.युवासेनेच्या आदित्यच्या बालहट्टापोटी भाजपासोबतची २५ वर्षांची युती तोडून स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या शिवसेनेकडे सर्व जागांवर उमेदवारही मिळू शकले नाहीत. युती तुटल्यापासून उद्धव ठाकरे यांनी सतत परस्परविरोधी भूमिका घेत पक्षातच संभ्रम निर्माण केला. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे करायचा आणि त्याचवेळी दुसरीकडे दोनेकशे उमेदवारांना बी फॉर्म वाटून टाकायचे. त्यामुळे ऐनवेळी मनसेचा हातही शिवसेनेला धरता आला नाही. निवडणूक प्रचारात भाजपावर विश्वासघाताची टीका केली, पण केंद्रातील अवजड उद्योग हे फुटकळ खाते सोडवले नाही. परंतु तरीही ६३ जागा जिंकून भाजपाला बहुमतापासून रोखले. शिवसेनेने मिळविलेले हे यश निश्चित कौतुकास्पद होते. पण पुन्हा उद्धव यांच्या धरसोड वृत्तीमुळे सत्तेपासून शिवसेना लांबच राहिली.राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकून सरकार चालविण्यासाठी आता शिवसेनेची आम्हाला गरज उरलेली नाही, असा संदेश भाजपाने देऊन टाकला. आता विरोधीपक्षनेतेपदही हातून जाते की काय, म्हणून घाईघाईने त्यांनी ते पद पदरात पाडून घेतले. एकदा विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहाण्याऐवजी उद्धव यांनी वाटाघाटीसाठी ‘वर्षा’चे दार पुन्हा-पुन्हा ठोठावले. तिथेही पुन्हा तोच धरसोडपणा दाखवला. एकीकडे सत्तेसाठी भाजपा नेत्यांसोबत बंद दाराआड वाटाघाटी आणि दुसरीकडे दुष्काळी भागाच्या पाहाणी दौऱ्याच्या निमित्ताने सरकारवर टीका. उद्धव यांचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न शिवसैनिकांनाही पडला होता.भाजपासोबत वाटाघाटींचे गुऱ्हाळ सुरू झाले तेव्हा अखंड महाराष्ट्राचे वचन, जैतापूर प्रकल्पाला विरोध या आपल्या अटी असल्याचे उद्धव सांगत होते, पण प्रत्यक्षात मंत्रिपदे, खाती यावरच तडजोड करीत होते. महाराष्ट्रातील नेत्यांसोबत चर्चा करणार नाही, असे उच्चरवात सांगणाऱ्या उद्धव यांनी शेवटी राज्यातील नेत्यांसोबतच चर्चेचा पट मांडला. सत्तेसाठी आसुसलेल्या शिवसेनेचे पाणी भाजपाने पुरते जोखले होते. त्यामुळेच गेला महिनाभर चर्चेच्या फेऱ्यांत त्यांना अडकवून ठेवले. यामुळे वाटाघाटी हा टिंगल-टवाळीचा विषय झाला, शिवसेनेची सत्तालालसा टीकेची लक्ष्य झाली.केंद्रातील अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद सोडायचे नाही, महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद घेऊन भाजपावर टीका करायची आणि मध्यरात्री सत्ता सहभागाच्या वाटाघाटी करीत बसायचे अशी त्रिशंकू अवस्था उद्धव यांच्या धोरणांमुळे शिवसेनेची झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जी शिवसेना रोखठोक भूमिकेकरिता ओळखली जायची तिची सत्तेमागील फरफट भाजपा नेतृत्वाने हेरली आणि आता शिवसेनेला लज्जारक्षणापुरताच सत्तेचा वाटा दिला. स्वाभिमानाच्या गमजा मारणाऱ्या शिवसेनेच्या हाती चणे-फुटाणे टाकून भाजपाने निवडणुकीनंतरचाही डाव जिंकला!