शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...तर सेना स्टाईलने समजावणार!

By admin | Updated: November 30, 2015 03:07 IST

राज्यात युती सरकारच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे योजनांची अंमलजबावणी होत नसल्याचे आमदारांच्या दौऱ्यात आढळून आले आहे.

नांदेड/परभणी/जालना : राज्यात युती सरकारच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे योजनांची अंमलजबावणी होत नसल्याचे आमदारांच्या दौऱ्यात आढळून आले आहे. या अधिकाऱ्यांचे काय करायचे ते मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ठरविले पाहिजे. संबंधितांना सरकारी भाषा समजत नसेल, तर शिवसेनेच्या भाषेत त्यांना समजवायचे का, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला. जालना, नांदेड आणि परभणी येथे शिवसेनेच्या वतीने उद्धव यांच्या हस्ते दुष्काळग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले. जालना व नांदेडला प्रत्येकी १ हजार व परभणीत ९ शेतकऱ्यांना उद्धव यांच्या हस्ते १० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ३ शेळ्या, संगोपनासाठी ५ हजार रुपये आणि विमापत्राचे वाटप करण्यात आले़उद्धव म्हणाले, निवडणुका आल्या की नेत्यांचा सुकाळ असतो. जेवढा मोठा नेता तेवढी मोठी थाप असते. मात्र, सध्या कोणत्याही निवडणुका नसताना शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे. पक्षाचे सर्व मंत्री व आमदार गेले दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दुष्काळी स्थितीचा अभ्यास केला. आत्महत्या न करण्याचे आणि इतरांनाही सावरण्याचे वचन उद्धव यांनी उपस्थित शेतकऱ्यांकडून घेतले. आम्ही सरकारमध्ये असलो तरी शेतकरीविरोधी धोरणांचा नेहमीच विरोध करू़ सरकारमध्ये असलो काय अन् नसलो काय? जनतेच्या हितासाठी टीकाच काय तर सरकारचा पंचनामाही करू, अशा शब्दांत उद्धव यांनी सुनावले़ उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री दीपक केसरकर, विजय शिवतारे, संजय राठोड, रवींद्र वायकर, दादाभाऊ भुसे आदी त्यांच्यासोबत होते. शासकीय योजनांची घोषणा होत असताना त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी आता शिवसैनिकांची राहील, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले़ लोकांनी जिल्हा प्रमुखांशी संपर्क साधावा. तक्रारींची १० दिवसांत दखल घेतली जाईल, असेही ते म्हणाले.एसटीतर्फे ९ कोटीपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एस.टी.महामंडळाचे कर्मचारी व संघटनांच्या वतीने ९ कोटी रुपये दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले.छायाचित्रांच्या बोलीतून निधीदुष्काळग्रस्तांना आतापर्यंत ७ ते ८ कोटी रूपयांची मदत केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या बोलीतून ही रक्कम उभी राहिली असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.