शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लष्करने केला होता बाळासाहेब ठाकरेंना मारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 25, 2016 03:57 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेने प्रयत्न केला होता. मात्र ज्याच्यावर ही कामगिरी सोपविण्यात आली होती तो पकडला

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेने प्रयत्न केला होता. मात्र ज्याच्यावर ही कामगिरी सोपविण्यात आली होती तो पकडला गेल्याने डाव फसला, अशी कबुली अमेरिकन-पाकिस्तानी एलईटी आॅपरेटीव्ह डेव्हिड हेडली याने गुरुवारी उलटतपासणीवेळी दिली. मात्र, नंतर तो पोलीस कोठडीतून पसार होण्यात यशस्वी ठरल्याचेही हेडलीने सांगितले. शिवसेना भवनला दोनदा भेट दिल्याचे हेडलीने कबूल केले. मात्र नक्की कोणत्या वर्षी ही भेट दिली, हे तो सांगू शकला नाही. ‘एलईटीचे लक्ष्य शिवसेनाप्रमुख होते... त्यांचे नाव बाळ ठाकरे. संधी मिळेल, तेव्हा एलईटीला त्यांना मारायचे होते. बाळ ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होते, एवढेच मला माहीत आहे. मला याबद्दल थेट माहिती नाही, परंतु ठाकरे यांना मारण्याचा प्रयत्न एलईटीने केला होता. याची जबाबदारी त्यांनी एकावर सोपविली होती. मात्र जबाबदारी पार पाडायच्या आधीच त्याला अटक करण्यात आली. तरीही तो पोलिसांच्या ताब्यातून सुटण्यात यशस्वी झाला, एवढेच मला माहीत आहे,’ असे हेडलीने अबू जुंदालचे वकील वहाब खान यांनी घेतलेल्या उलटतपासणीवेळी सांगितले. ठाकरे यांच्याशिवाय अन्य कोणत्या व्यक्ती एलईटीच्या रडारवर होत्या, हे माहीत नसल्याचे हेडलीने न्या. जी. ए. सानप यांना सांगितले. हेडलीची उलटतपासणी शुक्रवारीही सुरूच राहणार आहे. (प्रतिनिधी) आयएसआयकडून आर्थिक रसद...मुंबईवरील हल्ल्यासाठी काही ठिकाणांची रेकी करण्यासाठी कोणी आर्थिक मदत केली? अशी विचारणा अ‍ॅड. खान यांनी हेडलीला केली. त्यावर हेडलीने २६/११च्या हल्ल्यासाठी आयएसआयने आर्थिक मदत केल्याचे न्यायालयाला सांगितले.‘मुंबईत रेकी करण्यासाठी मला आयएसआयने सर्व आर्थिक मदत केली. मी त्यांच्याकडे पैसे मागितले नाहीत. या रेकीसाठी ३० ते ४० लाखांपेक्षा अत्यंत कमी खर्च आला,’ असे हेडलीने न्या. जी. ए. सानप यांना सांगितले. अल-कायदासाठी काम...२६/११च्या हल्ल्यानंतरही मार्च २००९मध्ये हेडली भारतात आला होता. या वेळी त्याला रेकीसाठी अल-कायदाने पैसे दिले होते. इलियास कश्मिरीने या दौऱ्यासाठी १ लाख रुपये दिल्याचे हेडलीने स्पष्ट केले. ‘२६/११च्या हल्ल्यानंतर एलईटीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येत होता. मात्र एलईटी भारतासाठी ‘सॉफ्ट’ झाले, असे म्हणणे अयोग्य आहे. ते डेन्मार्कसंदर्भात (मिकी माऊस) ‘सॉफ्ट’ झाले आणि त्यामुळेच मी एलईटीमधून अल-कायदासाठी काम करायचे ठरवले,’ असेही हेडलीने म्हटले.हल्ल्यातील मृतांचा उल्लेख ‘कार्टून’...२६/११ हल्ल्याचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या साजियाने हेडलीला मेल पाठवला. त्यात तिने मृतांचा व जखमींचा उल्लेख ‘कार्टून’ असा केला आहे. ‘मी कार्टून पाहत आहे. तुझा अभिमान आहे. अभिनंदन!!!’ असा मेल साजियाने हेडलीला पाठवला होता.