शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर भरती पेपर फुटी प्रकरणी गोव्यात छापे टाकून तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 19:31 IST

लष्कराच्या भरतीसाठी सुरू असलेल्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या पूर्वीच फोडून ते विकण्याचे छडयंत्र उघडकीस आल्यानंतर

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 26 - लष्कराच्या भरतीसाठी सुरू असलेल्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या पूर्वीच फोडून ते विकण्याचे छडयंत्र उघडकीस आल्यानंतर गोव्यातही छापे टाकण्यात आले. हणजुणे येथे छापा टाकून तिघांना हणजुणे पोलिसांनी रंगेहाथ पकडून ठाणे क्राईम ब्रँचच्या स्वाधीन केले. ही कारवाई शनिवारी रात्री १० च्या सुमारास झाल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिली. गोव्यातील परीक्षा केंद्रात परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपैकी ४९ जणांना संपर्क करून त्यांच्याशी डील सुरू असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. हणजुणे येथील ज्या संध्या बारमध्ये ही कारवाई झाली त्या ठिकाणी ४९ उमेदवार आणि अन्य तिघे युवक होते. हे तिघे उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना प्रश्नपत्रिका विकण्याच्या तयारीत होते. तिघा सौदेबाजांसह ४९ उमेदवारांनाही ताब्यात घेण्यात आले. ठाणे क्राईम ब्रँचच्या पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली होती. तिघांनाही ठाणे क्राईम ब्रँचच्या स्वाधीन करण्यात आले. सौदेबाजांनी आणलेल्या प्रश्नपत्रिका या खरोखरच लष्कर भरती परीक्षेच्याच आहेत की बोगस आहेत याची खात्री करून घेण्यापूर्वी कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे रात्रभर त्यांना ताब्यात घेऊन ठेवण्यात आले होते. रविवारी १० वाजता फोंडा येथील केंद्रात परीक्षा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी परीक्षेची प्रश्नपत्रिका तपासून पाहिले तेव्हा सौदेबाजांकडे असलेली प्रश्नपत्रिका समान असल्याचे आढळून आले. त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या सौदेबाजांना अटक करण्यात आली असे गुप्ता यांनी सांगितले. व्हॉटसेपव्हरून सौदाएका उमेदवाराला एक पेपर २ लाख रुपये या दराने विकला जाणार होता. एकूण ४९ उमेदवारांशी सौदा ठरला होता. पैसे घेऊन त्याचवेळी सौदेबाज आपल्या व्हॉटसेपमध्ये असलेली प्रश्नपत्रिका उमेदवाराला पाठविणार होते. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा हा सौदा झाला होता, सुरू होता की सुरू झालाच नव्हता याची माहिती पोलिसांनी उघड केली नाही, परंतु तिघाही सौदेबाजांकडून पैसे जप्त करण्यात आले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. परंतु हा सौदा झालेला असेल तर तो प्रत्येकी २ लाख रुपये या प्रमाणे ४९ उमेदवारांकडून ९८ लाख रुपये एवढा होत आहे.