शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर पेपरफुटी प्रकरणात नाशकातील तीन संशयितांचा समावेश

By admin | Updated: February 27, 2017 23:18 IST

४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक : लष्करभरती परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच प्रश्नपत्रिका फुटल्याने ठाणे गुन्हे शाखेने राज्यातील विविध ठिकाणांहून २१ संशयितांना अटक केली आहे़ त्यामध्ये नाशिकमधील संदीप बबन नागरे (३२, रा़वऱ्हेदारणा, ता़निफाड, जि़नाशिक), किरण अशोक गामणे (३२, रा. वऱ्हेदारणा, ता. निफाड, जि़नाशिक) हे दोघे नाशिकमधील नाशिककर करीअर अ‍ॅकेडमीचे संचालक, तर संदीप दौलत भुजबळ (२६, रा़ बिटको पॉइंट नाशिकरोड) हा विद्यार्थी आहे़ या सर्व संशयितांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़लष्करभरतीसाठी देशभरात रविवारी (दि़२६) लेखी परीक्षा होणार होती़ मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणले़ ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, अकोला, वर्धा व नाशिक येथील २१ संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये माजी सैनिक, विविध करिअर अकॅडमीचे संचालक, लष्करातील जवान, अधिकारी तसेच विद्यार्थ्यांचाही समावेश आहे़लष्कर पेपरफुटी प्रकरणात नाशिकच्या नागरे, गामणे व भुजबळ या तिघांचा समावेश आढळून आल्याने अटक करण्यात आली आहे़ प्रत्येकी चार ते पाच लाख रुपयांना या प्रश्नपत्रिकेची विक्री करीत असल्याचे समोर आले आहे़ यातील संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या संशयितांना ठाणे येथील न्यायालयात हजर केले असता ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़(प्रतिनिधी)