शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेना आमदार बाळा सावंत यांचे निधन

By admin | Updated: January 10, 2015 02:00 IST

शिवसेनेचे आमदार प्रकाश तथा बाळा सावंत यांचे गुरुवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. ‘मातोश्री’चे आमदार ही त्यांची ओळख होती.

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश तथा बाळा सावंत यांचे गुरुवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. ‘मातोश्री’चे आमदार ही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सच्चा शिवसैनिक हरवल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.सावंत यांनी २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे (पूर्व) येथून विजय मिळवला होता. यावेळच्या निवडणुकीपूर्वी युती तुटल्यामुळे ‘मातोश्री’ हे शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान असलेला हा मतदारसंघ सावंत राखणार का, याबाबत कुतूहल होते. मात्र सावंत यांनी विजय प्राप्त करीत या मतदारसंघात शिवसेनेची पताका कायम राखली. सावंत हे तीनवेळा मुंबई महापालिकेचे सदस्य होते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सावंत यांचे अत्यंत जिव्हाळ््याचे संबंध होते. बाळा सावंत प्रचंड जनसंपर्कासाठी ओळखले जात. मात्र, प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या काही वर्षांत मतदारसंघातील त्यांचा थेट संपर्क कमी झाला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी व शिवसैनिकांनी सावंत यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर टीचर्स कॉलनी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. सावंत यांच्या निधनाने लढाऊ कार्यकर्ता गमावला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामान्य लोकांशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली होती. अडीअडचणीला हाकेवर धावून येणारा कार्यकर्ता ही त्याची ओळख अखेरपर्यंत कायम होती, असेही फडणवीस म्हणाले.