शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकाला भरदिवसा लुटले

By admin | Updated: June 20, 2016 23:09 IST

न्यायालयीन कामकाजासाठी शहरात आलेले लष्करातील हवालदार प्रकृती खराब झाल्यामुळे चक्कर येऊन पडले. त्यावेळी चार जणांनी त्यांच्या खिशातील रोख २१ हजार रुपये

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. २० -  न्यायालयीन कामकाजासाठी शहरात आलेले लष्करातील हवालदार प्रकृती खराब झाल्यामुळे चक्कर येऊन पडले. त्यावेळी चार जणांनी त्यांच्या खिशातील रोख २१ हजार रुपये आणि मोबाईल, असा सुमारे २९ हजारांचा ऐवज बळजबरीने काढून नेला होता. एलोरा हॉटेलजवळ १३ जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी २० रोजी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी सांगितले की, लष्करातील हवालदार भाऊसाहेब दौलत आग्रे (रा. डोंगरगाव, ता.कन्नड) हे नाशिक येथे कार्यरत आहेत. ते सध्या रजेवर आहेत. त्यांचा आणि पत्नीचा न्यायालयीन वाद सुरू असल्याने १३ जून रोजी ते औरंगाबादेतील न्यायालयात आले होते. त्यानंतर दुपारी ते जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले. तेथील जेवण त्यांना व्यवस्थित न वाटल्याने ते हॉटेलबाहेर पडले. सकाळपासून जेवण न झाल्याने त्यांना प्रचंड अशक्तपणा आल्याने ते चक्कर येऊन कोसळले. रस्त्यावर ते अर्धवट बेशुद्धावस्थेत पडल्याचे पाहून चार जण अचानक त्यांच्याजवळ आले. त्यांनी भाऊसाहेब यांच्या खिशातील मोबाईल आणि रोख २१ हजार रुपये काढून घेतले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शरीरात त्राण नसल्याने त्यांचा प्रतिकार कमी पडला. या घटनेनंतर ते गावी परत गेले आणि रुग्णालयात उपचार घेतले. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी क्रांतीचौक ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय बनकर तपास करीत आहेत.