शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सेना नगरसेवकाची भररस्त्यात हत्या

By admin | Updated: December 26, 2015 03:29 IST

अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान शिवसेना नगरसेवक तसेच जळगावचे उपजिल्हाप्रमुख रमेश (पप्पू) गुंजाळ यांच्यावर शुक्रवारी सकाळी मोरिवली उद्यानासमोर अनोळखी मारेकऱ्यांनी

अंबरनाथ : अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान शिवसेना नगरसेवक तसेच जळगावचे उपजिल्हाप्रमुख रमेश (पप्पू) गुंजाळ यांच्यावर शुक्रवारी सकाळी मोरिवली उद्यानासमोर अनोळखी मारेकऱ्यांनी चॉपरने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या गुंजाळ यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले, पण चार तास मृत्यूशी झुंज दिल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या घटनेनंतर शहरात बंद पाळण्यात आला.गुंजाळ हे सकाळी ९.१५च्या सुमारास मोरिवलीच्या निवासस्थानापासून दाढी करण्यासाठी बाहेर पडले. नेहमी सुरक्षारक्षकांसोबत निघणारे गुंजाळ घरातून एकटेच निघाल्याचा डाव मारेकऱ्यांनी साधला. गुंजाळ दाढी करून साधारण १५ मिनिटांनी घरी परतत असताना चारचाकी गाडीत दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी मोरिवली उद्यानासमोर त्यांच्या दुचाकीसमोर आपली गाडी आडवी करून त्यांना गाडीवरून पाडले आणि त्यांच्यावर धारदार चॉपरने वार केले. हातावर आणि डोक्यावर वर्मी गाव बसल्याने ते रस्त्यात कोसळले. मारेकऱ्यांनी लागलीच चॉपरने गुंजाळ यांचा गळा चिरून गाडीतून पळ काढला. (प्रतिनिधी)चार तास मृत्यूशी झुंजगुंजाळ यांच्यावर हल्ला झाल्याचे कळताच त्यांचे सहकारी धावतच घटनास्थळी आले. त्यांना टेम्पोत टाकून जवळच्या अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण प्रकृती गंभीर असल्याने लागलीच त्यांना रिक्षातून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. बेशुद्धावस्थेत असलेल्या गुंजाळ यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती मंदावल्याने त्यांना पुन्हा कल्याणच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. पण, चार तास मृत्यूशी झुंज दिल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच अंबरनाथ शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.