मुंबई : बेस्टच्या तिकिटांचे दर व वीज बिलांमध्ये कपात करण्याचे श्रेय खिशात घालणाऱ्या भाजपाच्या ‘अच्छे दिन’चा बुरखा अखेर काँग्रेसने आज फाडला़ भाडेकपातही निव्वळ धूळफेक असून प्रत्यक्षात ५२ बसमार्ग बंद करण्यात आल्याच्या निर्णयाला विरोधी पक्षाने पालिकेच्या महासभेत आज आव्हान दिले़ ही संधी साधून शिवसेनेनेही काँग्रेसचा हात धरत बसमार्ग बंद करण्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापविले.सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या समितीचे अध्यक्षपद भाजपाकडे आले आहे़ त्यामुळे पालिकेची आगामी निवडणूक स्वतंत्र लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाने बेस्ट भाडे आणि वीजदरांमध्ये कपात करण्याची घोषणा केली़ राज्यात भाजपाचेच मुख्यमंत्री असल्याने या मागण्या मान्य करून घेत याची जाहिरातबाजीही भाजपाने सुरू केली़ मित्रपक्षाच्या या खेळीमुळे शिवसेनेच्या गोटात तीव्र नाराजी पसरली होती़ मात्र हे अच्छे दिन म्हणजे मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी पालिकेच्या महासभेत आज केला़ याविरोधात सभा झटपट तहकूब करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला़ त्यामुळे आधीच संधीच्या शोधात असलेल्या शिवसेनेला आयती संधी चालून आली़ दादरमध्ये सुरू केलेली बसफेरी बंद केल्याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी भाजपावर आगपाखड केली़ (प्रतिनिधी)>शिवसेनेच्या वॉर्डातील बसमार्ग बंदशिवसेनेचे नगरसेवक असलेल्या काही वॉर्डांतील बसमार्ग बंद करण्यात आले आहेत़ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपाने ही खेळी केली आहे, असा संताप काही सेना नगरसेवकांनी व्यक्त केला आहे़ तर शहरातील वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात येणारी वाहतूक विभागाची तूट म्हणजेच टीडीएलआर रद्द करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी प्रयत्न केले होते़ मात्र मुख्यमंत्री त्यांचेच असल्याने आता वीजदरकपात करण्यात येत असल्याकडे शिवसेनेने लक्ष वेधले़>शिवसेनेचा भाजपावर पलटवारभाजपाचा डाव उलटविण्यासाठी चालून आलेल्या आयत्या संधीचे सोने करीत शिवसेनेने मित्रपक्षावर आज पलटवार केला़ काँग्रेसने मांडलेल्या सभा तहकुबीवर भाजपा सदस्यांना बोलण्याची संधी न देता महापौरांनी पालिकेची महासभा नियमांवर बोट ठेवून झटपट तहकूब केली़ त्यामुळे भाजपाची कोंडी झाली़वीजदरकपातीसाठी प्रस्तावकुलाबा, फोर्ट ते माहीम, सायनपर्यंतच्या दहा लाख वीज ग्राहकांच्या बिलातून वसूल करण्यात येणारी वाहतूक विभागाची तूट या जून महिन्यापासून रद्द करण्यात येणार आहे़ बेस्टने याबाबतची सुधारित याचिका राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केली आहे़ त्यामुळे वीज ग्राहकांच्या बिलात २२ टक्के कपात होण्याचा दावा भाजपा करीत आहे़
सेना-काँग्रेसची ‘बेस्ट’ मैत्री
By admin | Updated: April 30, 2016 02:06 IST