शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची व्यूहरचना सपशेल फसली!

By admin | Updated: October 24, 2014 04:27 IST

विधानसभा निवडणुकीत ‘मिशन १५०’ जाहीर करून त्याचा आग्रह धरण्याची शिवसेनेची व्यूहरचना सपशेल फसली असून आता जर शिवसेना बिनबोभाट राज्यातील सत्तेत सहभागी झाली ना

संदीप प्रधान, मुंबई विधानसभा निवडणुकीत ‘मिशन १५०’ जाहीर करून त्याचा आग्रह धरण्याची शिवसेनेची व्यूहरचना सपशेल फसली असून आता जर शिवसेना बिनबोभाट राज्यातील सत्तेत सहभागी झाली नाही, तर मुंबई व ठाणे महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्षपद गमावण्याची वेळ शिवसेनेवर चार महिन्यांनी येऊ शकते.मुंबई शहरात भाजपाचा शिवसेनेपेक्षा एक जास्त आमदार विजयी झाला. ठाण्यात शहरातील जागा शिवसेनेने गमावली. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे २७ सदस्य असून त्यामध्ये शिवसेनेचे ९, भाजपाचे ४, मनसेचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, काँग्रेसचे ६, समाजवादी पार्टीचा १, अपक्ष १ तर गवळीच्या पक्षाचा १ असे सदस्य आहेत. राज्यातील सरकारमध्ये सहभागी होताना शिवसेनेने आढेवेढे घेतले व काही कारणास्तव सहभाग झाला नाही, तर भाजपा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा व अपक्ष हे एकत्र येऊन शिवसेनेकडून अध्यक्षपद खेचून घेऊ शकतात. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ७, भाजपाचा १, मनसेचा १, राष्ट्रवादीचे ५ तर काँग्रेसचे २ सदस्य आहेत. येथेही भाजपा, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले जाऊ शकते. असे झाल्यास महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची या दोन प्रमुख महापालिकांतील आर्थिक सत्ता संपुष्टात येऊ शकते.विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मिशन १५०चा आग्रह सोडला असता तर विधानसभा निवडणुकीत ५३ ठिकाणी शिवसेना-भाजपा परस्परांच्या विरोधात लढले नसते. त्यापैकी ३२ ठिकाणी भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत केले तर २१ मतदारसंघांत शिवसेनेने भाजपाच्या उमेदवारांना धूळ चारली.