शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक बसवरून सेना-भाजपात खडाजंगी

By admin | Updated: May 10, 2017 01:49 IST

राज्य परिवहन सेवेत इलेक्ट्रिक बसच्या समावेशावरून भाजपा आणि शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. सुखकर प्रवासासोबत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य परिवहन सेवेत इलेक्ट्रिक बसच्या समावेशावरून भाजपा आणि शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. सुखकर प्रवासासोबत प्रवासी वाहतूक नफ्यात आणण्यासाठी एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बस घ्याव्यात, अशी भूमिका केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांच्या वेगावर असणारी मर्यादा आणि चार्जिंग स्टेशनची अनुपलब्धता आदी कारणांमुळे लांब पल्ल्यासाठी या बसेस वापरणे शक्य नसल्याचे, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे मत आहे. देशातील ५४ राज्य परिवहन महामंडळांच्या ताफ्यात तब्बल दोन लाख बसेस आहेत. त्या पारंपरिक इंधनावर धावतात. त्यामुळे प्रदूषणासोबतच वाहतूक खर्चात वाढ होते. यावर इलेक्ट्रिक बसेस हा योग्य पर्याय आहे. राज्य परिवहन महामंडळांनी इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी योग्य प्रस्ताव सादर केल्यास त्यांना केंद्राकडून आर्थिक मदत केली जाईल, असे नितीन गडकरी यांनी ‘इंडिया इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक समीट-२०१७’ या चर्चासत्रात म्हटले होते. याबाबत राज्याचे परिवहनमंत्री रावते म्हणाले की, इलेक्ट्रिक बस शहरी वाहतुकीसाठी सोईची असली, तरी लांब पल्ल्यासाठी निरूपयोगी आहे. एसटी प्रामुख्याने लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक सेवा देते. त्यामुळे इलेक्ट्रिक बसचा वापर व्यवहार्य ठरणार नाही. मुळात इलेक्ट्रिक बसचा वेग कमी आहे आणि लांब पल्ल्याच्या ठिकाणी चार्जिंग स्थानकांचा प्रश्न आहे. भविष्यात वेग व चार्जिंगचा प्रश्न सुटला, तर याचा विचार होऊ शकतो.