शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपा ‘एकीचे बळ’ अधिक ठरले असते

By admin | Updated: October 24, 2014 04:20 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादिले असले आणि शिवसेनेच्या जागांमध्येही वाढ झाली असली, तरी युती तुटल्याचा मोठा फटका या पक्षांना बसला

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादिले असले आणि शिवसेनेच्या जागांमध्येही वाढ झाली असली, तरी युती तुटल्याचा मोठा फटका या पक्षांना बसला आहे. एका विश्लेषणानुसार, हे दोन्ही पक्ष युती करून निवडणुका लढले असते, तर त्यांना आणखी ५३ जागा जिंकता आल्या असत्या. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागांमध्ये मात्र मोठी घट झाली असती. तसेच अपक्ष आणि लहान पक्षांच्या पारड्यातही कमी जागा पडल्या असत्या.भाजपा- मित्रपक्षांनी १२३ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या आहेत. दोघांनी मिळून जिंकलेल्या जागांची संख्या १८६ आहे. या दोन्ही पक्षांचे मताधिक्य पडताळून पाहाता ५३ जागांवर त्यांनी परस्परांना क्षय दिले आहेत. म्हणजेच महायुती असती, तर त्यांना २३९ जागांवर आघाडी घेता आली असती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळे लढून ४२ आणि ४१ म्हणजेच एकूण ८३ जागा मिळविल्या आहेत. हे पक्ष एकत्र लढले असते, तर त्यांना यापेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या असत्या, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सेना-भाजपाच्या युतीला अहमदनगर आणि ऐरोली या जागा सहज जिंकता येणे शक्य होते. तसेच मनसेने जिंकलेली एकमेव जुन्नरची जागा आणि एमआयएमने जिंकलेली औरंगाबादची जागाही युतीच्या उमेदवारांना जिंकता आली असती. तसेच जत, करमाळा या जागाही महायुतीला काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकता आल्या असत्या. (प्रतिनिधी)