शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षेसाठी फिरते सशस्त्रपथक

By admin | Updated: July 21, 2016 02:11 IST

तालुक्यात विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी फिरते सशस्त्र पथक नियुक्त करण्यात येईल,

वडगाव मावळ : तालुक्यात विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी फिरते सशस्त्र पथक नियुक्त करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.कोपर्डी (अहमदनगर) येथील गरीब कुटुंबातील नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करून निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेचा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने निषेध करून दुष्कृत्य करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा करून न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार पाटील यांना देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.जिल्हा उपाध्यक्ष अतुल वायकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक अंकुश आंबेकर, राष्ट्रवादी सरपंच संघटना अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, तानाजी शेडगे, लहू वाडेकर, पांडुरंग गरुड, किशोर ढोरे, विकास सातकर, मोहित कदम, चंद्रकांत भुंडे, प्रतीक पिंजण, रमेश भुरूक व कार्यकर्ते उपस्थित होते.वायकर म्हणाले, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांचा वचक कमी झाल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांमुळे शासनाचा नाकर्तेपणा दिसत असल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे. अशा घटना रोखण्यासाठी शासनाने कायद्याची जनजागृती करून गुन्हेगारांना कडक शासन करावे. तालुक्यातील शाळा व महाविद्यालय परिसरात सशस्त्र महिला व पुरुष पोलीस गस्त सुरू करून विद्यार्थिनी व महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी. तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, निवेदनातील मागणी शासनाकडे पाठविण्यात येईल. शाळा व महाविद्यालयात ठेवलेल्या सूचना पेटीत तक्रारी टाका किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.प्रास्ताविक पडवळ यांनी, सूत्रसंचालन पिंजण यांनी केले. आभार कदम यांनी मानले. (वार्ताहर)