शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

भररस्त्यात गुंडांचा एकमेकांवर सशस्त्र खुनीहल्ला

By admin | Updated: August 23, 2016 18:04 IST

सल्या चेप्या गोळीबार प्रकरणातील तडीपार गुंड भानुदास धोत्रे व बापू चांदणे या दोन गुंडांनी मंगळवारी सकाळी भर रस्त्यात एकमेकांवर खुनीहल्ला चढविला.

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २३ : सल्या चेप्या गोळीबार प्रकरणातील तडीपार गुंड भानुदास धोत्रे व बापू चांदणे या दोन गुंडांनी मंगळवारी सकाळी भर रस्त्यात एकमेकांवर खुनीहल्ला चढविला. खुन्नस दिल्याच्या कारणावरून झालेल्या सशस्त्र हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, घटनेनंतर शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यावरून तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भानुदास लक्ष्मण धोत्रे (रा. शनिवार पेठ, कऱ्हाड) याने दिलेल्या फिर्यादीवरून बापू जयपाल चांदणे व त्याचा चुलतभाऊ गोट्या ऊर्फ किशोर हरीभाऊ चांदणे (दोघेही रा. महात्मा फुले नगर, बुधवार पेठ, कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर बापू चांदणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार भानुदास धोत्रेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या भानुदास धोत्रे व गोट्या चांदणे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

शहरातील शनिवार पेठेत राहणारा भानुदास धोत्रे हा सल्या चेप्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर यापूर्वीही अन्य गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मंगळवारी सल्या चेप्या गोळीबार प्रकरणाची येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी सकाळी तो कऱ्हाडात आला होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून भाजी मंडईकडून बसस्थानकाकडे निघाला होता. त्यावेळी बापू चांदणे व भानुदास धोत्रे समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांवर खुनीहल्ला चढविला.

सुरी व अन्य धारदार शस्त्राने एकमेकांवर वार केल्याने भानुदास धोत्रे व बापूचा चुलतभाऊ गोट्या चांदणे हे दोघेही जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही जखमींना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तसेच न्यायालय परिसरासह प्रभात टॉकीज परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला. या घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे.डॉन झाला का म्हणत हल्ला! भानुदास धोत्रेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी भानुदास दुचाकीवरून जात असताना बापू चांदणे त्यांच्या अंगावर थुंकला. याबाबत भानुदासने त्याला जाब विचारला असता तू सल्यावर फायरिंग केले म्हणून स्वत:ला डॉन समजतोस का,असे म्हणत त्याने व त्याचा भाऊ गोट्याने भानुदासवर सुरीने हल्ला केला. त्यामध्ये भानुदासच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भानुदास म्हणाला तुला ठोकतो!बापू चांदणेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बापू चांदणे हा मंगळवारी सकाळी मंडईतून भाजी घेऊन घराकडे जात असताना भानुदास धोत्रे दुचाकीवरून आला. बापूकडे बघून ह्यतुला ठोकतो, असे म्हणत त्याने त्याला मारहाण केली. त्यावेळी गोट्या चांदणे भांडणे सोडविण्यास आला असताना भानुदासने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला.