शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन गोहाड ठरला चॅम्पियन

By admin | Updated: February 16, 2017 03:46 IST

एकतर्फी झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात अर्जुन गोहाडने शिवम कदमचा ६-२, ६-२ असा पराभव करत अखिल भारतीय मानांकित

मुंबई : एकतर्फी झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात अर्जुन गोहाडने शिवम कदमचा ६-२, ६-२ असा पराभव करत अखिल भारतीय मानांकित १४ वर्षांखालील टेनिस स्पर्धेत रोटरी चषकावर नाव कोरले. मुलींच्या गटात हर्षाली मांडवकरने रिजुल सिदानळेचा ६-२, ६-२ असा पराभव करत बाजी मारली.अखिल भारतीय टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरातच्या ११९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मुलांच्या अंतिम सामन्यात सुरुवातीच्या सेटमध्ये अर्जुन गोहाडला शिवम कदमने चांगली टक्कर दिली. मात्र अर्जुनने आघाडी घेतल्यानंतर शिवम दडपणाखाली आला. यामुळे शिवमकडून अनेक चुका झाल्या. अर्जुनने एकहाती वर्चस्व राखताना शिवमला पुनरागमनाची एकही संधी न देता ६-२, ६-२ अशा दिमाखदार विजयासह जेतेपदावर नाव कोरले.मुलींच्या गटात हर्षालीने रिजुलचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. दोन्ही खेळाडंूनी सुरुवातीला आक्रमक खेळ केला. मात्र रिजुलला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. तीच्याकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत हर्षालीने सामन्यावर पकड मिळवून सहजपणे विजेतेपदाला गवसणी घातली. (क्रीडा प्रतिनिधी)