डिप्पी वांकाणी, मुंबईआरिफ माजिद याचे मनोबल भंग करून त्याला हवे तसे बोलते करण्यासाठी एनआयएने आता नवी पद्धत वापरली आहे. माजिदची चौकशी त्याच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत केली जात आहे. यातून तपास यंत्रणांना आणखी एक बाब साधायची आहे. ती अशी, की तपासादरम्यान त्याची छळवणूक झाल्याचे आरोप त्याचे कुटुंबीय करू शकणार नाहीत. आरिफला रात्री परळ परिसरातील भोईवाडा येथील तुरुंगात ठेवले जाते. सकाळी त्याला कडक बंदोबस्तात एनआयएच्या दक्षिण मुंबईतील कंबाला हिल येथील कार्यालयात चौकशीसाठी आणले जाते. तेथे त्याचे वडील आणि काका चौकशीदरम्यान चकरा मारत आहेत. काही वेळा घरातील महिला सदस्यही त्यांच्याबरोबर असतात. यातून दोन गोष्टी साधल्या जातात, असे सूत्रांनी सांगितले. एक तर आरिफचा कट्टरपणा घरच्यांसमोर मोडून पडून तो बोलता होईल आणि घरचे त्याच्या छळवणुकीचा आरोप करू शकणार नाहीत. आरिफ जिवंत परत आल्याबद्दल त्याच्या कुटुंबियांना आनंद तर झाला आहे मात्र तो परतल्यापासून त्यांचा परिसरातील वावर कमी झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले. पूर्वी तो, त्याचे वडिल आणि मित्र परिसरात घोटाळताना दिसायचे. आता ते जवळपास बंदच झाले आहे.
आरिफ माजिदची आता कुटुंबियांसमोर चौकशी
By admin | Updated: December 5, 2014 03:50 IST