शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

अघोरी शक्तीसाठी दिला नरबळी

By admin | Updated: November 16, 2014 01:41 IST

सात दिवसांपासून विदर्भात गाजत असलेल्या रूपेश मुळे मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले.

वर्धा : सात दिवसांपासून विदर्भात गाजत असलेल्या रूपेश मुळे मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. अघोरी शक्ती वाढविण्यासाठी रूपेशचा नरबळी दिल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात आसिफ शहा वल्द अजीम शहा उर्फ मुन्ना पठाण (4क्) हा एकमेव आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
सुमारे 12 वर्षापूर्वी आसिफ पश्चिम बंगाल येथून काळी विद्या शिकला. तेथून यवतमाळातील स्वगावी आल्यानंतर त्याची गुप्तधनाची लालसा वाढली. काही मांत्रिकांकडून याबाबतची माहितीही त्याने जाणून घेतली. यानंतर त्याने ही विद्याही आत्मसात केली. तेव्हापासून तो गुप्तधनाच्या शोधात होता. मात्र त्याला प्रत्येकवेळी अपयशच आले. यामुळे तो खचून गेला होता. दीड वर्षापूर्वी तो वर्धेत वास्तव्याला आला.  येथे तो ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता. अशातच त्याने देवळी तालुक्यात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न केला असता तिथेही त्याला अपयश आले. आपली विद्या कमी पडत आहे. ती वाढविण्यासाठी नरबळी देण्याचा अघोरी विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागला. तेव्हापासून तो एका कोवळ्या मुलाच्या शोधात होता. अखेर त्याने 8 नोव्हेंबरला नरबळी देऊन हनुमानजीची महापूजा करण्याचा बेत आखला. 
तो नेहमी आर्वी नाका चौक परिसरात ऑटोचा व्यवसाय करायचा. त्यामुळे त्याची लागूनच असलेल्या झोपडपट्टीतील लोकांशी ओळख झाली होती. रूपेशसह त्याच्या वडिलांच्याही तो संपर्कात होता. 8 नोव्हेंबरला सायंकाळी 5.3क् वाजता रूपेश मित्रसोबत खेळत असताना  फिरायला जाऊ असे सांगून तो त्याला ऑटोमध्ये बसवून घेऊन गेला. त्यानंतर बायपास परिसरात कोवळ्या रूपेशची हाताने गळा दाबून त्याने हत्या केली. यानंतर ऑटोत आधीच असलेल्या चादरीमध्ये त्याचा मृतदेह गुंडाळून मागील सीटच्या खाली ठेवला. तेथून तो वर्धा शहरातील गांधीनगर परिसरात विकास विद्यालयाच्या मागील बाजूला आला आणि तेथील अंधाराचा फायदा घेत त्याने अतिशय क्रूरपणो रूपेशचे दोन्ही डोळे काढले, त्याच पद्धतीने  दोन्ही किडण्याही काढल्या तसेच त्याचे गुप्तांगही कापले. या वेळी रात्री 1क्.3क् वाजताची वेळ असल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितल्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  (प्रतिनिधी) 
 
च्आरोपी आसिफ पोलिसांना आपणच हत्या केली हे सांगत होता. मात्र हत्येचे कारण तो सांगत नसल्यामुळे या प्रकरणात आणखी काही आरोपी असावेत, असा संशय पोलिसांना होता. त्याच्या सांगण्यावरून पोलीस पथक विविध भागांत तपासासाठी जात होते. मात्र हाती काहीच लागत नव्हते. पोलिसांना आसिफ हा गंडे, धागेदोरे देतो, असे माहीत होताच त्याची उलटतपासणी सुरू केली. तुला चामडय़ाच्या जोडय़ातील पाणी पाजतो, असे म्हणताच आता आपले मंत्र कायमचे विसरून जाऊ या भीतीपोटी त्याने केलेल्या अघोरी कृत्याची कबुली दिली.
 
‘लोकमत’ने वर्तविला होता नरबळीचा संशय
रूपेशच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वप्रथम ‘लोकमत’ने नरबळीचा संशय वर्तविला होता. इतकेच नव्हे, तर आरोपीला अटक होईर्पयत आणि प्रकरणाचा छडा लागेर्पयत हे प्रकरण उचलून धरले होते. यामुळे या घटनेने संतप्त वर्धेकर रस्त्यावर उतरले होते. विविध संघटनाही रूपेशला न्याय देण्याच्या मागणीला घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने हाताळल्याने विदारक सत्य पुढे आले.