शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीपूर्वीच बदलले सदनिकांचे क्षेत्रफळ; प्रकाश मेहतांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 04:34 IST

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या ताडदेवच्या एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बिल्डरने वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लाटण्यासाठी परवानगी मिळण्याआधीच...

मुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या ताडदेवच्या एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बिल्डरने वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लाटण्यासाठी परवानगी मिळण्याआधीच बी-२-डी (सिंहगड) या इमारतीमधील सहा मजल्यांवरील १२ सदनिकांच्या बांधकामात बदल केल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या निदर्शनास आला आहे. त्यामुळे जणूकाही मेहता यांच्याकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची खात्रीच बिल्डरला होती, असा संशय आता व्यक्त होत आहे.‘लोकमत’ने प्रत्यक्ष या वादग्रस्त ‘एसआरए’ प्रकल्पाला भेट दिली असता, हा प्रकार उघडकीस आला आहे. एमपी मिल कंपाउंडमधील ‘सिंहगड’ या नावाने ओळखल्या जाणाºया बी-२-डी इमारतीच्या पहिल्या सहा मजल्यांवरील प्रत्येकी दोन सदनिकांच्या बांधकामात बदल करून २२५ चौरस फुटांवरून २६९ चौरस फुटांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. मुळात परवानगी नसतानाही, बिल्डरने येथील गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकाºयांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचा आरोप शिव संकल्प जनजागृती मंचाने केला आहे.मंचाचे सदस्य एकनाथ घाडगे यांनी सांगितले की, राज्य सरकारने झोपु योजनेअंतर्गत देण्यात येणाºया २२५ चौरस फुटांच्या जागेत वाढ करत २००८ साली २६९ चौरस फुटांची सदनिका देण्याचा निर्णय जाहीर केला. त्या निर्णयानुसार बिल्डरने वाढीव क्षेत्रफळासाठी २००८ साली आॅक्टोबर महिन्यात रहिवाशांची बैठक बोलावली. त्यानंतर २०१७ पर्यंत गृहनिर्माण संस्थांसोबत बिल्डरने बैठक घेतली नाही.